कोरोनातून लवकर बरा हो.. कुटुंबाची काळजी घे; पंकजा मुंडेंचा भाऊरायाला फोन!

कोरोनातून लवकर बरा हो.. कुटुंबाची काळजी घे; पंकजा मुंडेंचा भाऊरायाला फोन!

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेल्याचं समजताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली.

  • Share this:

बीड, 12 जून: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झालेल्याचं समजताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली. 'स्वतःची काळजी घे कुटुंबाची काळजी घे आई आणि मुली लहान आहेत. कोरोनामधून लवकर बरा हो, असं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पहिल्यांदाच संभाषण झालं. या संभाषणाची राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा होती.

हेही वाचा... देशातले निम्मे रुग्ण राज्यात आणि राज्यातले निम्मे मुंबईत, हे आहेत HOT SPOTS

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आली. त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत पण श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर...

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असली तरी ते व्यवस्थित आहे. पण त्यांना जरा श्वसनाचा त्रास झाला म्हणून ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. ते आमच्यासोबत बैठकीसाठी उपस्थित होते. मंत्रीमंडळ बैठकीत सगळे फिजिकल डिस्टंसिंग राखून बसतात. आमच्या पक्षाच्या झेंडावंदनाच्या दिवशीदेखील फिजिकल डिस्टंसिंग पाळलं होतं. अजित पवारांच्या शिस्तीनुसार आम्ही बैठक करतो. मंत्रिमंडळ बैठकीतही ते अंतर राखलं जातं. सगळीकडे कोरोनामुळे बदल होतो. त्यामुळे आम्हीही शिस्तीचं पालन करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा... तुकाराम मुंढेंनी नागपुरात करुन दाखवलं, आदित्य ठाकरेंनी केलं कामगिरीचं कौतुक

धनंजय मुंडे 8-10 दिवसांत पुन्हा एकदा काम करायला लागतील. यापुढे सगळ्यांनाच जोपर्यंत कोरोनावर औषध येत नाही किंवा लस येत नाही तोपर्यंत त्याची काळजी करावी लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचं पालन करा आणि कोणतीही लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करणं महत्त्वाचं असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.

First published: June 12, 2020, 9:18 PM IST

ताज्या बातम्या