मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपची बैठक का टाळली? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

भाजपची बैठक का टाळली? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ झाल्याने बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ झाल्याने बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ झाल्याने बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

मुंबई, 11 नोव्हेंबर : महाराष्ट्रात मोठा जनाधार असलेल्या नेत्यांमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचंही नाव अग्रक्रमाने घेतलं जात असे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हाच जनाधार त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्यासोबत जोडला गेला. मात्र आता याच पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ झाल्याने बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. मात्र स्वत: पंकजा मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी व्यस्त असल्यानं बैठकीला येऊ शकणार नाही, असा निरोप पंकजा मुंडे यांनी पक्षाला पाठवल्याची माहिती आहे.

गोपीनाथ गडावरील मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 12 डिसेंबरला 12 वाजता मेळाव्यास सुरुवात होणार असून विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेतील यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का? याबाबतीत तर्क वितर्क लावले जात आहेत. या कार्यक्रमात राज्यातील सर्वच मुंडे समर्थकांना 12 तारखेला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्याच दिवशी स्वाभिमान दिवस म्हणून गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे या त्यांच्या समर्थकांसमोर निर्णय घेणार आहेत.

First published: