मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /फेल नेतृत्वाचा पर्दाफाश करणार, गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंची रणनीती जाहीर

फेल नेतृत्वाचा पर्दाफाश करणार, गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंची रणनीती जाहीर

आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या पोळ्या भाजन्यचं काम केलं-पंकजा मुंडे

आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या पोळ्या भाजन्यचं काम केलं-पंकजा मुंडे

आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या पोळ्या भाजन्यचं काम केलं-पंकजा मुंडे

बीड, 3 जून: माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज गोपीनाथ गडावरून (Gopinath Gadh) आगामी रणनीती जाहीर केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहिणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आणि कोरोनामधील भ्रष्टाचार (Corruption in Covid pandemic) हे तीन मुद्दे घेऊन महाराष्ट्रभर फिरणार असून फेल ठरलेल्या नेत्रृत्वाचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला आहे. त्या गोपीनाथ गडावरील स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त बोलत होत्या.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, या वर्षी मी भावुक आहे. माझा बाप घराघरात जाणार आहे. नेत्याचा ऐतिहासिक सन्मान आहे. गेल्या दोन वर्षांत मी निवडणुकीत पराभूत झाले. तुमच्या मानतील ज्योत पराभूत होणार नाही. मराठा समाजाची घोर निराशा झाली, त्या समाजाचा प्रत्येक तरुण मला विचारतोय, ताई... मुंडे साहेब भगवान गडावर म्हटले होते तुम्हाला आरक्षण देऊ. आज मुंडे साहेब असते तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाला मोठा धोका झाला आहे. कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न आज निर्माण होत आहे.

मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका गोपीनाथ मुंडे साहेबांचे आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडताना राज्य सरकार अपयशी ठरले. ओबीसींचे राजकीय आरक्षण 50%च्यावर झाले तेव्हा ग्रामविकासमंत्री मी होते... तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यांना बोलून अध्यादेश काढला, कोर्टात भूमिका मांडली. मात्र हे राज्य सरकार कमी पडलं म्हणून हक्काच्या आरक्षणवर गदा आणली असा आरोपही त्यांनी केला.

छत्रपतींचा महाराष्ट्र समतेचा संदेश देतो, त्याच महाराष्ट्रातील तरुणांसमोर जाती-धर्माच्या भींती उभ्या राहिल्या आहेत. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या पोळ्या भाजन्याचं काम केलं आहे. या पिडिला खर सांगा भाषण करून नका. किती टक्के आरक्षण मराठा समजला देणार देणार 16 टक्के नाही तर किती टक्के किती दिवसात. ते पण सांगा, ओबीसींचा भ्रम निराश झाला किती दिवसात दुरुत करता मागास आयोग कधी स्थापन करणार ते हे सांगा. जनता सहिष्णु, जनता जातीवादी, जनता धर्मवादी नाही... पुढारी जाती धर्मच्या भिंती उभ्या करतात. स्वतःच्या मोठे पणासाठी काम करतात.

गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने धनंजय झाले भावुक, म्हणाले...

रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर, बेड काळाबाजार सुरू, लसीकरण सुरळीत नाही, जीवन जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. तिसरी लाट येते या संदर्भात सरकारला कुठंही गांभीर्य दिसून येत नाही. सपशेल फेल ठरलेल्या नेतृत्वाचा परधापाश करण्यासाठी गावोगाव जायचं... शिवाजी पार्क भरवायच कोरोनाचे नियम पाळून मी महाराष्ट्र भर फिरणार नाही, मी लवकर मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे, काही सूचना करणार आहे.

पराभव हा अल्प विराम आहे, तो पूर्ण विराम नाही हा ही एक अनुभव आहे. जो जीवनामध्ये मी घेतला आहे. पण लोकांच्या माणसातील आशा संपून जातील तो खरा पराभव आहे. निवडणुकीचा पराभव झाला असला तरी लोकांच्या मनात अशा अजून जीवंत आहेत. त्याच आशा माझा ऑक्सिजन आहे. त्याच अशा माझ्या रेमडेसिव्हिर आहे. व्हेंटिलेटरवर आहे. आज तीन वेगवेगळ्या पक्षाचं सरकार आहे वेगवेगळ्या दिशेनं ओढत आहे. मला आता विरोधी पक्षामध्ये वज्र मूठ करायची आहे. खुर्ची हे ध्येय नसून जनतेला दिलेला शब्द पाळणे हा खरा उद्देश आहे. ज्याच्या लढ्याला धार नाही त्याला धार द्ययाची ज्याला आधार नाही त्याला आधार द्यायचा आहे.

पोस्टाच्या पाकिटाने पंतप्रधान नरेंद मोदी यांना मन की बात मध्ये प्रश्न विचारा.. ओबीसींवर अन्याय झाला, मराठा समाजावर अन्याय झाला. रेमडेसिव्हिर काळाबाजार, तर पंतप्रधान यांना पत्र पाठवा, पंतप्रधान कार्यालयात खच पडेल पत्राचा हे करायचं आहे. मराठा समाजाला न्याय मिळला पाहिजे त्या संदर्भात पत्र मी सुद्धा एक पत्र लिहिणार आहे अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

First published:

Tags: Beed, Maratha reservation, Pankaja munde