विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं..भाऊ-बहीण आमने-सामने

विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं..भाऊ-बहीण आमने-सामने

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं आहे. विकास कामाच्या उद्घाटनावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत.

  • Share this:

बीड, 11 जुलै- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीआधीच परळीत राजकारण तापलं आहे. विकास कामाच्या उद्घाटनावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत.पंकजा मुंडेंच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या इमारतीचे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने परस्पर उद्घाटन केले आहे.

चार कोटी 80 लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या (12 जुलै) रोजी होणार होते. मात्र, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) सायंकाळीच परळी पंचायत समितीच्या इमारतीचे सभापती, उपसभापती सदस्य आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी उद्घाटन केले आहे. पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये पत्रक वॉर सुरु झाले. यात पंचायत समितीचे उद्घाटन नाट्य चर्चेचा विषय बनला आहे.

धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळेच भव्य इमारत झाल्याचे राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. श्रीफळ फोडून व फीत कापून या इमारतीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असताना आणि या इमारतीसाठी धनंजय मुंडे साहेबांनी ही पाठपुरावा केला असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी उद्याचा उद्घाटन सोहळा होत आहे. या सोहळ्यातही राजशिष्टाचाराचे पालन न केल्याच्या निषेधार्थ आजचे उद्घाटन आम्ही करीत असल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, येत्या विधानसभेचे राजकारण तापत असताना विकास कामाचे श्रेय लाटण्याची विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात स्पर्धा लागली आहे की काय असा प्रश्न, साहजिकच निर्माण होत आहे.

परळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून सभापती उपसभापती यांच्यासह 12 सदस्यांपैकी आठ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत असावी यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र, केवळ श्रेय लाटण्याच्या हेतूने मुख्य शासकीय कार्यक्रमात राजशिष्टाचार न पाळता कार्यक्रमाचे आयोजन उद्या शुक्रवारी करण्यात आले आहे. त्याचा निषेध म्हणून पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) सायंकाळी या इमारतीचे उद्घाटन केले. असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतं आहेत. भाजपाकडून पत्रक बाजीकरत विरोधकांवर टीका केली.

राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनो जनाची नाही, मनाची तरी बाळगा..

सत्ताधारी सदस्यांनी पंचायत समितीच्या इमारतीचे केलेले उद्घाटन हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या अधिकृतपणे परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होत असून कावेबाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी घाईघाईने केलेले उदघाटन हास्यास्पद असून शुध्द वेडेपणा आहे. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा, असा उपरोधिक टोला भाजपचे पंचायत समितीचे सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे, मोहनराव आचार्य व रेणूका फड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.

वास्तविक पाहता पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना नवीन इमारती मंजूर केल्या, एवढेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी देखील त्यांनी दिला. बीड जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पंचायत समित्यांच्या नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. परळी येथे 4 कोटी 80 लाख रुपये खर्च करून पंचायत समितीची नवीन अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली इमारत बांधून तयार आहे. या इमारतीचे लोकार्पण उद्या (12 जुलैला) दुपारी 3 वाजता होणार होते.

यामध्ये तळमजला व अन्य दोन मजले असलेल्या या प्रशासकीय इमारतीत एकाच छताखाली पंचायत समितीच्या कार्यालयाबरोबरच बांधकाम विभाग, सिंचन, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण, आरोग्य, पशूसंवर्धन व महिला बालविकास विभागाचे कार्यालय ही बांधून तयार आहे. मात्र या इमारतीचे उद्घाटन आगोदर केल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडें बंधू भगिनींचा सत्ता संघर्ष निवडणुकीआधीच तापू लागल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे.

VIDEO : मराठा समाजाकडून पंकजा मुंडेंची घोड्यावरून मिरवणूक

First published: July 11, 2019, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading