भाजपचा ओबीसी आरक्षणासाठी एल्गार, पण OBC नेत्यांनीच फिरवली बैठकीकडे पाठ!

भाजपचा ओबीसी आरक्षणासाठी एल्गार, पण OBC नेत्यांनीच फिरवली बैठकीकडे पाठ!

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने ओबीसी आरक्षणाचे हत्यार उपसले आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, भाजपने (BJP) बोलावलेल्या ओबीसी मोर्चा समितीच्या बैठकीला पक्षातील ओबीसी नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde), चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनीच पाठ फिरवल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने ओबीसी आरक्षणाचे हत्यार उपसले आहे. आज मुंबईतील भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात ओबीसी मोर्चा समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ओबीसी संघटनेचे नेते आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, योगेश टीळेकर आदी नेते उपस्थितीत होते. परंतु, या बैठकीला ओबीसी नेत्यांनीच पाठ फिरवली.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, आंदोलकांनी दिल्ली जयपूर हायवे केला बंद

ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची ओबीसी मोर्चाला अनुपस्थिती होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नुकतेच ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजपने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन ओबीसी नेत्याचे नेतृत्व पुन्हा एकदा उभारण्याचा प्रयत्न केला आहे.

याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की,  'भाजपमध्ये राज्य कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर इतर सगळ्या मोर्चांची बैठक होते. सगळ्यांनीच याला यावं असं काही नाही. योगायोगाने मी आणि देवेंद्र फडणवीस आलो. ते आमचे नेते आहेतच पण त्याचे सगळे नेते मोर्चांच्या बैठकीला येतीलच असं काही नाही. आमची पार्टी नवीन रक्ताला वाव देणारी आहे.'

'सगळ्या मोर्चांच्या बैठका झाल्या आहेत. ओबीसी समाज भाजपपासून दूर गेलेला नाही. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला आहे' असंही पाटील म्हणाले.

लग्नाच्या बंधनात अडकला भारतीय क्रिकेटपटू, पत्नीसोबत मंडपातच खेळला क्रिकेट

दरम्यान, 'ओबीसी आरक्षणाला धक्का आम्ही लावू देणार नाही. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओबीसी समाजाबद्दलची भूमिका काय ते सांगा, आमची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही', असा थेट सवालही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

तसंच, 'आम्ही ओबीसींचं वेगळं मंत्रालय केलं होतं. ओबीसींकरता सध्या फक्त बोलबच्चन देत आहे.  या सरकारमधील मंत्री, आमदार, ओबीसी आरक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. हे आम्ही  सहन करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला तर खबरदार, हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही', असा इशाराच फडणवीस यांनी दिला.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या