मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'चांगला विकास करा', एकाच व्यासपीठावर आलेल्या पंकजांनी दिल्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

'चांगला विकास करा', एकाच व्यासपीठावर आलेल्या पंकजांनी दिल्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

 बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आज आले होते.

बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आज आले होते.

बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आज आले होते.

बीड, 05 फेब्रुवारी :  राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjaya Munde) आणि भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी, 'ज्यांच्या हातात सत्ता मिळाली ते नक्कीच चांगला विकास करतील' असं म्हणत पंकजा यांनी धनंजय यांना शुभेच्छा दिल्या. तर धनंजय यांनीही 'माजी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या' म्हणत पंकजांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

संत श्रेष्ठ वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर पहाटे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा पार पडली. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी याच व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही भाऊ आणि बहिणीत चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली.

राज ठाकरेंनी घेतली पुण्यात बैठक, पदाधिकाऱ्यांनी दिला 'एकला चलो रे'चा नारा

'ज्यांच्या हातात सत्ता मिळाली ते नक्कीच चांगला विकास करतील. यासाठी धनंजय मुंडेंना पंकजा यांनी शुभेच्छा दिल्या. पंकजा यांनी शुभेच्छा  दिल्याने त्याला उत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी लगेच उत्तर दिले.

'माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्याना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू' असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

RBI कडून व्याजदरात कोणताही बदल नाही, तुमच्या कर्जाच्या EMI वर काय होईल परिणाम?

बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आज आले होते. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एकत्र आले होते. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. गहिनीनाथगडाची मोठी परंपरा आहे. वर्षांनुवर्ष बीड जिल्ह्यातील नागरिकांचा श्रद्धेचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे.

या ठिकाणी आज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बंधू-भगिणी एकत्र पाहायला मिळाले. राजकारणात टोकाचा विरोध करणारे हे दोन्ही बहिण भाऊ आध्यत्मिक क्षेत्रावर पुण्यतिथी निमित्तांनी एकत्र येताना दिसतात. गहिनीनाथ गडावर पुन्हा एकदा हे दोघे एकाच मंचावर आलेली पाहायला मिळाले.

First published:

Tags: Beed