बीडमध्ये पुन्हा भाऊ आणि बहिणीचा वाद पेटणार, पंकजांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीडमध्ये पुन्हा भाऊ आणि बहिणीचा वाद पेटणार, पंकजांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

'वैद्यनाथ साखर कारखान्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी मला कर्ज मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले'

  • Share this:

बीड, 25 नोव्हेंबर : 'वैद्यनाथ साखर कारखान्या (Vaidyanath Sugar Factory) संदर्भ अपप्रचार केला जात आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी मला कर्ज मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले. हे करून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्याला त्रास देण्याचे काम काही लोकं करत आहेत', असा आरोप भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर केला.

वैद्यनाथ साखर कारखाना लि.पांगरी येथे 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

पहाटेच्या शपथविधीची खरी स्टोरी, 28 आमदारांना घेऊन अजितदादा फडणवीसांना म्हणाले...

'हा मुंडे साहेबांचा कारखाना आहे. मी कोणीच नाही. मी मात्र शुन्य आहे, मात्र जे माझ्यावर टीका करतात त्यांनी कधी मोळी तरी टाकली आहे का? असं म्हणत पंकजा यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे.

'वैद्यनाथ साखर कारखान्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. हा कारखाना चालू करण्यासाठी मला कर्ज मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले. परळी नगर पालिका ज्या पद्धतीने चालते, त्या पद्धतीने हा कारखाना नटबोल्ट विकून खावे, अशी ज्यांची अपेक्षा आहे. हे करून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आत्म्याला त्रास देण्याचे काम काही लोक करत आहेत, अशी टीकाही पंकजा यांनी केली.

भारतात पहिल्यांदाच ! रोबो देत आहे गाडीची डिलिव्हरी

कारखाना क्षेत्रात 450 लाख टन ऊस आहे. त्याचे योग्य गाळप करून चांगली रिकेव्हर करणे हा उद्देश आहे. आता राजकारण करण्याचे दिवस संपले असून आता फक्त शेतकऱ्यांचे हित पहा, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. या कार्यक्रमास साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकर्ते, तथा शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 5:31 PM IST

ताज्या बातम्या