मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये 'सिंघम'ची एण्ट्री, जबाबदारी सांभाळताच 2 पोलीस कर्मचाऱ्यांना दिला दणका

कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये 'सिंघम'ची एण्ट्री, जबाबदारी सांभाळताच 2 पोलीस कर्मचाऱ्यांना दिला दणका

मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याची जबाबदारी पंकज आशिया या तडफदार अधिकाऱ्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

मालेगाव, 14 एप्रिल : महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मालेगावमध्येही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. सुरुवातील एकही रुग्ण सापडलेला मालेगाव आता कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय की काय, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याची जबाबदारी पंकज आशिया या तडफदार अधिकाऱ्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पंकज आशिया यांनीही जबाबदारी सांभाळताच 2 पोलीस उपाधीक्षकांना पहिला दणका दिला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तसंच या अधिकाऱ्यांना दिली कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे. शहरात संचारबंदी लागू असूनही नागरिक रस्त्यावर फिरतायत तरी कसे? असा प्रश्न नोटीसमधून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे. या परिस्थितीचा खुलासा 24 तासाच्या आधी सादर करण्याचाही आदेश त्यांना देण्यात आला आहे. अन्यथा या दोन्ही पोलीस उपाधिक्षकांना शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा-72 वर्षाच्या आजीपासून 12 वर्षांच्या मुलापर्यंत, 300 पोलिसांना जेवण देण्यासाठी कुटुंब सेवेत गुंतलं दरम्यान, मालेगाव सामान्य रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास दोन महिलांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलांना न्युमोनिया, श्वसनाचा, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. यामध्ये एक 58 वर्षीय महिला मालेगाव शहरातील असून दुसरी महिला नांदगाव तालुक्यातील असल्याचे समजते. या महिलेचे वय साधारणत: 48 वर्षे सांगण्यात आले आहे.
First published:

Tags: Coronavirus, Malegaon

पुढील बातम्या