पावनखिंडीत दारू पिणाऱ्या मद्यपींना 'शिवराष्ट्र'चा दणका

पावनखिंडीत दारू पिणाऱ्या मद्यपींना 'शिवराष्ट्र'चा दणका

कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्याची झडती घेतली. दारू पीत बसलेल्यांना बाहेर काढून चांगलाच चोप दिला.

  • Share this:

कोल्हापूर 17 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पावनखिंडीमध्ये दारू पीत बसलेल्या वीस ते पंचवीस मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज झोडपून काढलंय. करवीर तालुका परिसरातील हे मद्यपी पावनखिंडमध्ये गाडीमध्ये दारू पीत बसले होते. या गाडीमध्ये डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचे चित्र होते. त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी मद्यपींना चांगला चोप दिला. शिवराष्ट्र संस्थेची 13 ते 15 जुलै दरम्यान पन्हाळगड पावनखिंड मोहीम होती. 15 जुलै रोजी पावनखिंडमध्ये मोहिमेचा समारोप झाला.

VIDEO: 15 दिवसांत शेतकऱ्यांची पिक विमा द्या, नाहीतर...उद्धव ठाकरेंचा इशारा

समारोप झाल्यानंतर कार्यकर्ते पांढरपाण्याची दिशेने जात असताना पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील वीस ते पंचवीस जण दारू पीत बसले होते. ही माहिती मिळताच शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्याची झडती घेतली. दारू पीत बसलेल्यांना बाहेर काढून चांगलाच चोप दिला.

कार्यकर्त्यांनी चोप देऊन त्यांची दारू उतरवली. यापुढे पावनखिंड तसेच किल्ल्यांवर दारू पिणार नसल्याची कबुली मध्यपींनी दिली. पावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवाजी महारांच्या पदस्पर्शाने हा परिसर पावन झालाय. त्यामुळे या परिसराविषयी लोकांच्या मनात आस्था आणि श्रद्धा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात या भागाला जत्रेचं स्वरुप येतं.

VIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक

ट्रेकसाठी येणाऱ्या लोकांसोबतच काही तरुण हे निव्वळ दारू पिण्यासाठी या भागात येतात. त्यामुळे बाटल्यांचा कचरा, प्लॅस्टिक आणि मद्यपींचा धुडगूस याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे पर्यटक आणि ट्रेकर्समध्येही नाराजी होती.

हा सगळा राग कार्यकर्त्यांनी आज काढला. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन काही कारवाई करत नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेऊन दणका दिल्याने मद्यपींमध्ये दहशत निर्माण झालीय.

First published: July 17, 2019, 3:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading