मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : पंढरपूरच्या बालाजीच्या हृदयावर एकनाथ शिंदे, तरुणाने कोरले मुख्यमंत्र्यांचे चित्र

VIDEO : पंढरपूरच्या बालाजीच्या हृदयावर एकनाथ शिंदे, तरुणाने कोरले मुख्यमंत्र्यांचे चित्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे चित्र पंढरपूरमधील एका तरुणाने त्याच्या ह्रदयावर कोरले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे चित्र पंढरपूरमधील एका तरुणाने त्याच्या ह्रदयावर कोरले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे चित्र पंढरपूरमधील एका तरुणाने त्याच्या ह्रदयावर कोरले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India
  • Published by:  News18 Desk

पंढरपूर, 29 ऑगस्ट : जून महिन्यामध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठा भूंकप घडला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेकांनी टिका केली. तर काही जणांनी त्यांचे समर्थनही केले आहे.

पाहा व्हिडिओ - 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे चित्र पंढरपूरमधील एका तरुणाने त्याच्या ह्रदयावर कोरले आहे. बालाजी भांड असे या युवकाचे नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यापासून व सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधत आहेत. नागरिकांशी संवाद सहज साधत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचिती येत आहे. त्यामुळे हलक्याफुलक्या शैलीत करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवकांच्या ह्रदयावर राज्य करताना दिसत आहेत.

हेही वाचा - पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटातील 15-16 आमदार संपर्कात; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका - 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सुरुवातीला फक्त या दोघांनीच शपथ घेतली होती.  यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी त्यांच्यावर सातत्याने निशाणा साधला. अखेर शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेऊन 35 हून अधिक दिवस झाले. यानंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या शपथविधी सोहळ्यात अपक्षांना तुर्तास स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अपक्ष आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी घटक पक्षांशिवाय सरकार चालू शकणार नाही, असा इशाराच दिला आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Maharashtra politics, Pandharpur, Shivsena