सोलापूर, 05 एप्रिल: पंढरपूरमध्ये (Pandharpur) एका तरुणानं प्रेम प्रकरणामुळे धक्कादायक पाऊल उचललं आहे. एका उच्चशिक्षित इंजिनिअर (engineer) तरुणाने पैठण येथे आत्महत्या (committed suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल दत्तात्रय चांडोले असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. निखिल अवघा 24 वर्षांचा होता. प्रेम प्रकरणातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले यांचा निखिल हा एकुलता एक मुलगा होता. निखिल याचं कुटुंब विजापूर गल्ली येथे राहतं. पोलिसांनी निखिलच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.
24 तासात 4 दहशतवादी हल्ल्यानं हादरलं खोरं, निशाण्यावर काश्मिरी पंडित; हल्ल्यात जवान शहीद
पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठी मध्ये त्याने ”तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” असे हिंदी सिनेमातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.
निखिल हा पैठण येथे शिक्षण आणि नोकरी करत होता. रविवारी दिवसपाळी करून तो रूमवर आला होता. मध्यरात्री त्याने रूममधील पंख्याला गळफास घेतला. सकाळी त्याचा मित्र रूमवर आल्यानंतर ही घटना समजली.
निखिलने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निखिलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असून तो पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.