गैरकारभाराला ग्रामस्थ वैतागले, रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी

गैरकारभाराला ग्रामस्थ वैतागले, रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी

एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे गैरकारभार...महिला रस्त्यावर उतरल्या.

  • Share this:

पंढरपूर, 21 जून : पंढरपूर शहराजवळ असणाऱ्या लक्ष्मीटाकळी येथील रेशन दुकानदाराविरुद्ध तेथील शिधापत्रिका धारक नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. मनमानी व भ्रष्ट कारभार करणाऱ्या दुकानदारावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी टाकळीच्या समाजसेविका कविता धोत्रे व कार्डधारकांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटात गोरगरीब जनतेला सरकारी नियमानुसार अत्यावश्यक धान्य पोहोच करण्यासाठी स्वस्त धान्य दुकादारांची नियुक्ती केली आहे. मात्र लक्ष्मी टाकळी येथील रेशनदुकानदार गणेश मुरलीधर कदम स्वत:चा फायदा करुन घेण्यासाठी चुकीच्या पध्दतीने धान्य वाटप करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

शिधापत्रीकेत नमूद असणाऱ्या व्यक्तींपेक्षा कमी धान्य देणे,स्वताच्या किरणा दुकानाचा माल बळजबरीने गळ्यात घालणे,माल घेतल्याची कोणतीही पावती न देणे, नियमापेक्षा जास्त दराने शासकीय धान्याची विक्री करणे,धान्य देण्यास टाळाटाळ करणे,कागदपत्रे जमा करुनही कार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यास टाळाटाळ करणे तसेच कशा बाबतही विचारणा केली असता उद्धट उत्तरे देणे, अशा अनेक तक्रारी कविता धोत्रे व कार्डधारकांनी केल्या आहेत.

हेही वाचा - भीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा, 3 जणांचा जागीच मृत्यू

गणेश कदम याने कोविड 19 योजनेत आलेल्या धान्याची कार्ड धारकांच्या परस्पर विक्री केल्याचेही समोर येत असून याच्या कारभारा विरुद्ध कविता धोत्रे यांनी लेखी तक्रार तहसिलदार पंढरपूर यांच्याकडे केलेली आहे. सदर दुकानदार हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष असून त्याचे स्वताचे कार्ड अंत्योदय योजनेखाली नोंदविले आहे.

या बाबत तक्रारदार नागरिकांचे जबाब देखील तहसिल कार्यालयाने घेतले आहेत. मात्र अद्याप रेशन दुकानदारावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

First published: June 21, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या