पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला धोका, होणार स्ट्रक्चरल ऑडिट

पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला धोका, होणार स्ट्रक्चरल ऑडिट

बेशिस्त बांधकामामुळे विठ्ठल मंदिराची वास्तू कमकुवत झाल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिला

  • Share this:

पंढरपूर, 21 जानेवारी: कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराला धोका असल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बेशिस्त बांधकामामुळे विठ्ठल मंदिराची वास्तू कमकुवत झाल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिला आहे. मंदिर परिसरात अवास्तव बांधकाम, विजेच्या वायर्सचे जाळे, छतावरील स्लॅब आणि वातानुकूल यंत्रणा यामुळे मंदिराच्या वास्तूवर प्रचंड ताण आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या या विठ्ठल मंदिराला दक्षिणेची काशी देखील म्हणतात. पण मंदिराला धोका असल्याचा अहवाल दिल्याने भक्तांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विठ्ठलाचे मंदिराची वास्तू अकराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. पण मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेल्या स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेल्या अवास्तव बांधकामामुळे छतावरील भार मुळ मंदिरावर येत आहे. याचा परिणाम मूळ मंदिराच्या वास्तूवर झाल्याचे पुरातत्व अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मंदिराला स्ट्रक्चरल धोका

मंदिराचा मुख्य भाग असलेल्या गाभाऱ्यात अनेक अवास्तव बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वास्तूला स्ट्रक्चरल धोका निर्माण झाला आहे. भितींवर लावण्यात आलेल्या फरशांमुळे गाभाऱ्यातील आद्रता मूर्तीस घातक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

VIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब

First published: January 21, 2019, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading