Home /News /maharashtra /

पंढरपुरच्या विठुरायांच्या चंद्रभागेला नजर लागली, प्रदुषणामुळे पाणी जीवास हानिकारक

पंढरपुरच्या विठुरायांच्या चंद्रभागेला नजर लागली, प्रदुषणामुळे पाणी जीवास हानिकारक

पंढरपुरात गेल्यानंतर विठुरायांच्या दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान आणि पुडलिकांचं म्हणजेचं संतांच्या पायरीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. पण सध्या या चंद्रभागेचं पाणी अत्यंत खराब आणि दुषित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

पंढरपूर, 12 एप्रिल : महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाच्या चरणी लोटांगण घालण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. विशेष म्हणजे आजही माघी यात्रेच्या निमित्ताने तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. हजारो भाविकांनी चंद्रभागा नदीत अंघोळ केली आहे. चंद्रभागानदीत स्नान केलं तर पाप भंग होतात, असं म्हटलं जातं. पण याच चंद्रभागेचं पाणी पिण्यायोग्य नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा अहवाल दिला आहे. पंढरपुरात गेल्यानंतर विठुरायांच्या दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान आणि पुडलिकांचं म्हणजेचं संतांच्या पायरीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. पण सध्या या चंद्रभागेचं पाणी अत्यंत खराब आणि दुषित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. चंद्रभागेचं पाणी पिण्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचं भूजल सर्वेक्षण विभागाने सांगितलं आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी हे पाणी तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाकडे दिलं होतं. त्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चंद्रभागेचं पाणी पिण्यासाठी अतिशय अयोग्य असल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे हे दुषित पाणी पिवून एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. (आई कुठे काय करते : अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ गाणं YouTube वर Trending !) यशवंतरावांनी विठुरायांना चंद्रभागेच्या पावित्र्याची ग्वाही दिलेली, पण... महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. उजनी धरणाची निर्मिती होणार होती. त्यामुळे त्यांनी विठुरायांची माफी मागितली होती. आम्ही चंद्रभागा अडवतोय. लोककल्याणासाठी हे काम करतोय. चंद्रभागेचं पावित्र्य आम्ही राखू, अशी ग्वावी यशवंतरावांनी त्यावेळी दिली होती. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. उजनी धरणाचं पाणी पळवण्यावरुन राजकारण होतं. पण जी चंद्रभागा एकेकाळी बारा महिने वाहत राहायची. पण आता चंद्रभागेत पाणी नाही. याशिवाय शेतीचा भार तिच्यावर आहे. उद्योगांचं सांडपाणी चंद्रभागेत सोडलं जातं. येणारे भाविक चंद्रभागेचं पाणी तिर्थ म्हणून पितात. पण ते पाणी आरोग्यासाठी आज घातक असल्याची परिस्थिती आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या