धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळला, पादचाऱ्यावर पडला

धावत्या एसटी बसचा दरवाजा निखळला, पादचाऱ्यावर पडला

सुदैवाने दरवाजा डोक्यात न पडता त्या पादचाऱ्याच्या उजव्या हाताला चाटुन गेला. हाताला जबर मुक्का मार लागलाय.

  • Share this:

पंढरपूर, 05 जून : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा ७० वा  वाढदिवस राज्यभर धुमधडाक्यात सुरू असताना पंढरपूरमध्ये मात्र त्याला गालबोट लागलं. धावत्या लालपरीचा चालकाजवळील दरवाजा निखळून रस्त्यावर पडला या अपघातात रस्त्यावरून जाणारा एक पादचारी मात्र गंभीर जखमी झाला आहे.

पंढरपूर सरकोली ही बस प्रवाशांना घेऊन सांगोला चौक मार्गे मार्गस्थ झाली अण्णाभाऊ साठे चौकातील खडबडीत रस्त्यावरून जात असताना बस चालकाजवळील दरवाजा अचानक तुटून रस्त्यांवरुन जाणाऱ्या एका पादचाऱ्याच्या अंगावर पडला.

दरवाजा अचानक निखळून पडला. सुदैवाने दरवाजा डोक्यात न पडता त्या पादचाऱ्याच्या उजव्या हाताला चाटुन गेला. हाताला जबर मुक्का मार लागलाय.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने मोडकळीस आलेल्या बसेस भंगारात काढून पंढरपूर डेपोला नव्या बसेस देण्याची मागणी पुढे येत आहे.

First published: June 5, 2018, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading