धक्कादायक! मुलाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीपोटी वृद्ध पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मुलाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीपोटी वृद्ध पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

घराशेजारील जनावरांच्या शेडमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आनंद कोळेकर यांनी आपलं जीवन संपवलं.

  • Share this:

पंढरपूर, 15 ऑगस्ट : मुलाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीपोटी वृद्ध पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. आनंदा धोंडिबा कोळेकर (वय-70) असं आत्महत्या केलेल्या वृद्धाचं नाव आहे. घराशेजारील जनावरांच्या शेडमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आनंद कोळेकर यांनी आपलं जीवन संपवलं. ही घटना सांगोला तालुक्यातील बामणी( शेळकेवाडी) येथे घडली आहे.

बामणी (शेळकेवाडी) येथील वामन आनंद कोळेकर याची 11 ऑगस्ट रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आरोग्य विभागाने त्याला कमलापूर येथील कोव्हिड सेंटर येथे दाखल केले. वामन कोळेकर यांच्या घरातील सर्व सदस्यांची आरोग्य विभागाकडून कोरोना टेस्ट केली जाणार होती.

आपला मुलगा वामन कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आपली टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येईल या भीतीपोटी वडील आनंदा कोळेकर यांनी शुक्रवारी पहाटे घराशेजारील जनावरांच्या पत्राशेडमधील लोखंडी अॅंगलला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

सून लक्ष्मी कोळेकर साफसफाईसाठी गोठ्यात गेल्यावर सासरे आनंदा यांनी आत्महत्या केल्याचे दिसल्याने त्यांनी घरातील सर्व लोकांना जागे केले. बेशुद्ध अवस्थेतील आनंदा यांना तात्काळ उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान, याआधीही राज्यात कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनातून मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असतानाही काही लोकांनी मात्र कोरोनाची मोठा धास्ती घेतली आहे. यातूनच मग या आजाराविरुद्ध लढण्याआधीच जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 15, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या