मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा एल्गार, पंढरपुरातील दिंडी आक्रोश मोर्चात गोंधळ

आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा एल्गार, पंढरपुरातील दिंडी आक्रोश मोर्चात गोंधळ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय दिंडी काढली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय दिंडी काढली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय दिंडी काढली जात आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
पंढरपूर, 07 नोव्हेंबर: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाज्याच्या वतीने पुकारलेल्या पंढरपुर ते मुंबई पायी दिंडी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपुरमध्ये संचार बंदी लागू केली आहे. पंढरपुरासह राज्यातील इतर काही भागांत देखील ही आक्रोश सुरू झाला आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून संचार बंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. दुसरीकडे कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे. विविध ठिकाणीहून आलेल्या आंदोलकनाला आंदोलन स्थळी सोडण्यासाठी आंदोलकांची घोषणा बाजी करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय दिंडी काढली जात आहे. मात्र पोलिसांनी याठिकाणी मज्जाव केल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. बदलापूर शहरातील मराठा नेते देखील आरक्षण आमच्या हक्काचे आहे,ते मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान पंढरपुरात दिंडीआधी पोलीस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ सुरू झाल्यानं तिथे गोंधळाचं वातावरण आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा सकल मराठा समाजाकडून एल्गार केला जात असून आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
First published:

पुढील बातम्या