मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, धडकी भरवणारं दृष्य CCTVमध्ये कैद

पंढरपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, धडकी भरवणारं दृष्य CCTVमध्ये कैद

शेजारील घरांना बाहेरून कडी लावायची आणि चोरी करून पसार व्हायचं असा या चोरट्यांचा पॅटर्न आहे.

शेजारील घरांना बाहेरून कडी लावायची आणि चोरी करून पसार व्हायचं असा या चोरट्यांचा पॅटर्न आहे.

शेजारील घरांना बाहेरून कडी लावायची आणि चोरी करून पसार व्हायचं असा या चोरट्यांचा पॅटर्न आहे.

  • Published by:  Akshay Shitole

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 31 जानेवारी : पंढरपूर शहरातील उपनगरात तीन चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. बंद असलेली घरे नजर ठेऊन मध्यरात्री फोडण्याची यांची पध्दत आहे. यामुळे उपनगरातील नागरिक या चोरट्यांच्या दहशतीखाली आहेत.

पंढरपूरच्या उपनगरातील अनेक घरे रात्री फोडून रोख रक्कम ,दागिने तसेच घरातील एलईडी टीव्ही सुध्दा या तीन जणांच्या टोळीने चोरून नेले आहेत. बंद असलेली घरे शोधायची, रात्री शेजारील घरांना बाहेरून कडी लावायची आणि चोरी करून पसार व्हायचं असा यांचा प्रकार आहे.

ज्या हाताने लाड केले त्याच हाताने भाच्याला संपवलं, 4 वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या

हे चोरटे 27 जानेवारीच्या पहाटे महात्मा फुले नगरमधील एका सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाले आहेत. हातात घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन फिरताना ते दिसत आहेत. पंढरपूरच्या उपनगरातील नागरिक मात्र या चोरट्यांच्या दहशतीखाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यात खून आणि दरोडेखोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांसमोर ही गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Pandharpur, Pandharpur crime