पिकअपच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू, सैन्यात जाण्याचं स्वप्न राहिलं अधुरं

पिकअपच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू, सैन्यात जाण्याचं स्वप्न राहिलं अधुरं

दोघे भाऊ पहाटे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले असताना हा अपघात झाला.

  • Share this:

पंढरपूर, 23 मे : पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर येथील दोन सख्या भावांना पिकअपने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर झाला. दोघे भाऊ पहाटे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले असताना हा अपघात झाला.

गोपाळपूर येथील बाळासाहेब निर्मळे गुरव यांना विजय (वय 19) आणि दयानंद (वय 16) ही दोन मुले होती. मोठा मुलगा विजय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी त्याचे मामा नागनाथ गुरव (रा. जवळा) यांच्याकडे गावाजवळील भोकसेवाडी (ता. सांगोला) येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता.

विजय आणि त्याचा भाऊ दयानंद हे दोघे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी निघाले होते. त्यावेळी एका पिकअप गाडीने त्यांना धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते. परंतु दोघांचाही उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विजय आणि दयानंद यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडील बाळासाहेब हे देखील गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण आजारी आहेत.

हेही वाचा - पुण्यात रात्रीच्या अंधारात 'मुळशी पॅटर्न' थरार, कोयत्याने सपासप वार करून गुंडाला संपवलं

सैन्यात भरती होण्यासाठी तयारी

विजय गुरव हा सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयारी करत होता. तो तयारीसाठी मामा नागनाथ गुरव यांच्याकडे भोकसेवाडी (ता. सांगोला) येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो आपल्या गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 23, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading