मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वारकरी संप्रदायासाठी मोठा आघात! प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचं 33व्या वर्षी निधन

वारकरी संप्रदायासाठी मोठा आघात! प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचं 33व्या वर्षी निधन

प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचं 33व्या वर्षी निधन

प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचं 33व्या वर्षी निधन

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

पंढरपूर, 26 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांपासून तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी आणि ज्येष्ठ वारकरी दिवंगत शाहू महाराज बेलापूरकर यांचे वंशज ह.भ.प. प्रसन्न महाराज बेलापूरकर (वय 33 वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. वारकरी संप्रदायासाठी हा मोठा आघात आहे.

पहाटेच्या सुमारात छातीत दुखू लागले..

प्रसन्न महाराज वर्षातून अमळनेर, पैठण, त्र्यंबकेश्वर आणि कार्तिकी यात्रा आळंदी अशा सहा पायी वाऱ्या करत असल्याने जवळपास सहा महिने ते पंढरपूरच्या बाहेरच राहत होते. यंदा आळंदीची पायी वारी करुन बुधवारी महाराज पंढरपूरमध्ये पोहोचले होते. आज शुक्रवारी पहाटे त्यांच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाल्यावर उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्न करुनही प्रसन्न महाराज यांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांच्या जाण्याने फड परंपरा तसेच सकल वारकरी संप्रदायात शोककळा पसरली. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे चुलत बंधू आणि बेलापूरकर फडाचे गादी अधिकारी मनोहर महाराज बेलापूरकर यांच्यासह आई, भाऊ असा परिवार आहे.

वाचा - Vikram Gokhale Passes Away : विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वारकरी संप्रदायाला मोठा धक्का

प्रसन्न महाराज यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ वारकरी संप्रदायाचे काम हाती घेतले होते. वारकरी संप्रदायातील आचरण संपन्न आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. पंढरपूर येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे ते काम पाहत असत. बेलापूरकर घराण्याचा मोठा भक्तगण असून वारकरी संप्रदायातील मोठ्या फडांमध्ये या फडाचा समावेश आहे. अतिशय कमी वयात वारकरी कीर्तनकाराचे अशा प्रकारे अकस्मितपणे जाण्याने वारकरी संप्रदायाला आणि त्यांच्या शिष्यवर्गाला मोठा धक्का बसला आहे.

तरुणांचं आरोग्य धोक्यात

गेल्या काही महिन्यांपासून तरुणांमध्ये अचानक हृदयाचा झटका येण्याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. तिशीच्या आतमध्येच तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारणं असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

First published:

Tags: Pandharpur