मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नातवंडं म्हणाली, 'तुला चढता येणार नाही' अन् भिंगे आजींनी कोराईगड सर करून दाखवला!

नातवंडं म्हणाली, 'तुला चढता येणार नाही' अन् भिंगे आजींनी कोराईगड सर करून दाखवला!

भिंगे आजींसारखी अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती असतील. पण ते आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं कोरोनाच्या या काळात सारख्या नकारात्मकतेच्या गराड्यात राहण्याऐवजी अशा सकारात्मक कथांद्वारे प्रेरणा मिळवणंच अधिक योग्य ठरेल.

पंढरपूर, 26 एप्रिल: योग्य उपचार, संतुलित आहार आणि प्राणायाम यानं कोरोनावर (coronavirus) यशस्वी मात करता येते. पण त्याचबरोबर जिद्द असेल तर तुम्ही आणखी मोठं काहीतरी करू शकता, याचा आदर्शपाट नव्वदी ओलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींनी घालून दिला आहे. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केलीच पण समुद्रसपाटीपासून तब्बल 3050 फूट उंचीवरचा कोराईगड (Grandmother climbed on fort) चढत त्यांनी तिथंही निरोगी आरोग्याचा झेंडा फडकावलाय.

(वाचा-कोरोनापासून बचावासाठी घ्या काळजी; वाचा फळे, भाजीपाला स्वच्छ करायची योग्य पद्धत)

दमयंती भिंगे यांनी वयाची नव्वदी ओलांडलेली. वर्षानुवर्षे त्यांना कोणताही आजार नाही. कायम घरकाम करण्यात व्यस्त. पण तरीही कोरोनानं त्यांना गाठलं. वय जास्त असल्यानं कुटुंबीय घाबरले. पण आजी अगदी बिनधास्त होत्या. आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देणं हा स्वभावच असल्यानं उलट त्यांनीच कुटुंबीयांना धीर दिला. पंढरपूर अर्बन बॅंकेतील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी सुधीर भिंगे आणि व्यापारी कमिटीचे सचिव इसाप्पा भिंगे ही त्यांची मुलं. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आजींना रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर आठ दिवसांनी घरी आणलं आणि विलगीकरणात ठेवलं. पण कशाचाही बाऊ न करता या वेळेत आजींनी धार्मिक पुस्तकं वाचत वेळ सार्थकी लावला. त्यामुळं विलगीकरणाचे दिवसही कधी संपले ते समजलं नाही. त्यानंतर पुन्हा त्यांचं दैनंदिन जीवन सुरू झालं.

(वाचा-EC च्या अधिकाऱ्यांवर हत्येचे खटले दाखल करायला पाहिजे; मद्रास हायकोर्टाचा संताप)

कोरोनावर मात केल्यानंतर आजी दोन महिन्यांनी नातवंडांसह लोणावळ्याला फिरायला गेल्या. नातवंडांनी जवळचा कोराईगड चढण्याचा प्लॅन केला. आजीचं वय पाहता नातवंडांनी त्यांना 'तू येऊ नको, तुला चढता येणार नाही' असं म्हटलं. पण आजी कुठं ऐकणार, त्यांनीही नातवंडांना 'मी येणारच' असं ठामपणे सांगितलं. आजीचा उत्साह पाहून नातवंडंही तयार झाले आणि त्यांची ही गडमोहीम सुरू झाली. कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या आजींनी नातवंडांच्या बरोबरीनं झपझप पावलं टाकत मोठ्या जिद्दीने गड सर केला.

अनेकदा कोरोनावर मात केल्यानंतर अनेक महिने थकवा, वीकनेस किंवा इतर त्रास झाल्याचं अगदी तरुण सांगत असल्याचं आपण पाहिलं आहे. पण तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर तुम्ही सहज यार मात करू शकता हे आजींनी दाखवून दिलं. भिंगे आजींसारखी अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती असतील. पण ते आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं कोरोनाच्या या काळात सारख्या नकारात्मकतेच्या गराड्यात राहण्याऐवजी अशा सकारात्मक कथांद्वारे प्रेरणा मिळवणंच अधिक योग्य ठरेल.

First published:

Tags: Coronavirus, Pandharpur