कौतुकास्पद! लग्नाचा खर्च टाळून PSI प्रविण साने यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रुपयांची मदत

कौतुकास्पद! लग्नाचा खर्च टाळून PSI प्रविण साने यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रुपयांची मदत

पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने यांनी लग्नास होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 2 जून : कोरोना विरोधातील लढाईविरोधात खारीचा वाटा म्हणून करमाळा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने यांनी लग्नास होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. तर अनेकांनी याला एक संधी समजून सकारात्मक दृष्टिकोन बाळगत त्या संधीला अविस्मरणीय केले आहे. खास करून या काळात लग्न बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यसाठी त्यांचा विवाह सोहळा आजन्म अविस्मरणीय राहणार आहे.

कोरोना कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कर्तव्यसोबतच करमाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रवीण धर्माजी साने यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपले लग्न साधेपणाने केले आहे व मुख्यमंत्री सहायता मदत निधी म्हणून 1 लाखाची मदत करून आपणही कोरोनाच्या लढ्यात आहोत हे दाखवून दिले. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी करमाळा येथे 45 दिवस कोरोनाच्या दरम्यान सेवा बजावली आहे व त्यानंतर विवाह केला आहे.

टाळगाव चिखली ता हवेली धर्माजी सोपान साने यांचे पुत्र पोलीस उपनिरीक्षक प्रवीण यांचा विवाह विलास बबन गाढवे रा आर्वी ता जुन्नर यांची कन्या स्नेहल( एम.ई. कम्प्युटर ) या दोन्ही उच्चशिक्षित यांचा विवाह 27 मे रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार होता पण कोरोनाच्या संकटामुळे व असलेल्या लाँकडाऊन मुळे दोन्हीकडील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आर्वी येथे पार पडला. सामाजिक अंतर ठेवत वधू-वरासह सर्वांनी तोंडाला मास्क बांधून हा विवाह सोहळा पार पडला.

हेही वाचा - कोरोनावर मात करण्यासाठी सापडला अस्सल घरगुती उपाय, संशोधकांनीही केलं मान्य

अत्यंत साधेपणाने व आदर्श पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबाने घेतला. आपल्या मुलांचा विवाह थाटामाटात पार पाडवा अशी दोन्ही कुटुंबाची इच्छा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे आवश्यक ती खबरदारी घेत कुठलाही बडेजाव न करता नुकताच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रवीण व स्नेहल यांचा विवाह आदर्श पध्दतीने पार पडला. लग्नात नवदाम्पत्य यांनी एकमेकांना मास्क व सॅनिटायजझर भेट देत त्याचा अवलंब करत आयुष्याच्या गाठी बांधल्या.

कोरोनाचे संकट असल्याने आणि जनसामान्यांची होत असलेली परवड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी लक्षात घेऊन लग्नास होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 1 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिकाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची बाब असते. त्याबाबत दोन्ही कुटुंबाने खूप स्वप्ने पहिली होती. थाटामाटात विवाह करण्याचा मानस होता परंतु कोरोनामुळे सर्व जागी थांबले. थाटामाटाने करण्याऐवजी आदर्श पद्धतीने पार पडला व दोन्ही कुटुंबांनी एक नवीन आदर्श उभा केलाय आणि ही परिस्थिती आयुष्यभर स्मरणात राहील असं मत नवदाम्पत्य प्रविण व स्नेहल यांनी व्यक्त केलं आहे.

First published: June 2, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading