VIDEO : कोरोनामुक्त पडळकरांवर JCB तून उधळली फुलं; पवारांना कोरोना संबोधण्यावरून झाला होता वाद

VIDEO : कोरोनामुक्त पडळकरांवर JCB तून उधळली फुलं; पवारांना कोरोना संबोधण्यावरून झाला होता वाद

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना अधिवेशनाच्या दिवशीच कोरोनाचा संसर्ग झाला होता.

  • Share this:

पंढरपूर, 12 सप्टेंबर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आज कोरोना मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडल्यावर शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर जेसीबीमधून गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोतीफुलांचा वर्षाव केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना अधिवेशनाच्या दिवशीच कोरोनाचा संसर्ग झाला होता.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पडळकर यांनी पंढरपुरात येऊन एका रुग्णालयात उपचार घ्यायला सुरूवात केली. पडळकर यांना कोरोनाची लक्षणे नव्हती. उपचारानंतर पडळकर यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आनंद झालेल्या समर्थकांनी थेट जेसीबीमधून फुलांचा वर्षाव पडळकर यांच्यावर केला. समर्थकांनी गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती फुलांचा वर्षाव केला. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं म्हणत पडळकर यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं होतं.

शरद पवारांविषयी आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पडळकर यांना कोरोनाची लागण झाली. सुदैवाने ते या आजारातून सुखरूप बाहेर पडले आहेत. त्यामुळे पडळकर यांच्या समर्थकांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Akshay Shitole
First published: September 12, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या