पंढरपूर, 29 मार्च : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजप कडून समाधान अवताडे या दोन तरुण नेत्यात लढत होणार असून उद्या दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असताना आज भाजप व राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दोन्ही पक्षातील जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नेते हजर राहणार असल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. (Pandharpur Mangalvedha assembly elections Announcement of candidates from BJP NCP)
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने या मतदारसंघाचा आम्ही विकास करू, तालुक्यातील जनता भाजपला चांगल्या मतांनी विजयी करेल, असा विश्वास पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना एबी फॉर्म देण्यात आला.
हे ही वाचा-मोठी बातमी! IIT च्या साहाय्याने निवडणूक आयोगाचे E Voting साठी प्रयत्न
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची 30 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. भाजपकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी भरताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Election, NCP, Pandharpur