मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पवारांचे निकटवर्तीय आमदार भालके यांचं निधन; कोरोनातून बरे होऊनही लढा अपयशी

पवारांचे निकटवर्तीय आमदार भालके यांचं निधन; कोरोनातून बरे होऊनही लढा अपयशी

आमदार भारत भालके यांचा Post Covid Complications मुळे मृत्यू झाला. कोरोना विषाणूवर मात करूनही काही दिवसात त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू होते.

आमदार भारत भालके यांचा Post Covid Complications मुळे मृत्यू झाला. कोरोना विषाणूवर मात करूनही काही दिवसात त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू होते.

आमदार भारत भालके यांचा Post Covid Complications मुळे मृत्यू झाला. कोरोना विषाणूवर मात करूनही काही दिवसात त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू होते.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

पुणे, 27 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आमदार  भारत भालके यांचं पुण्यात उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झालं. भारत भालके यांनी पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी Coronavirus ची लागण झाली होती. या विषाणूवर मात करत ते बरेही झाले होते. पण कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला  (Post covid complications)आणि गुंतागुंत निर्माण झाली. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

आमदार भारत भालके हे पंढरपूर मंगळवेढा इथून निवडून आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर संसर्गामुळे त्रास होत असल्याने त्यांना पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 'पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याची आणि प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात राहून आमदार भालकेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि भालके यांची प्राणज्योत मालवली.

सोलापूर- पंढरपूरमधला आणखी एक कोरोना बळी

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, हभप रामदास महाराज कैकाडी, भागवताचार्य वा.ना.उत्पात यांच्यानंतर कोरोनामुळे आणखी एका दिग्गज नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामुळे सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

आमदार भालके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यामुळे हॅटट्रिक आमदार म्हणून भारत भालके यांची ओळख होती.

सुरुवातीला त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली, पण नंतर काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला.

आमदार भारत भालके यांची कारकीर्द

2004  शिवसेना - पराभूत

2009 रिडालोस  - विजयी

2014 काँग्रेस- विजयी

2019 राष्ट्रवादी - विजयी

2009 साली पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी  पराभव करून ते जायंट क्लिर ठरले होते.

2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

2002 पासून विठ्ठल सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून  आजतागायत काम पाहत होते.

1992 साली ते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरुवात केली होती.

First published:

Tags: NCP, Pandharpur