पंढरपुरात मठामध्ये रक्ताचा सडा, मठाधिपतींची निर्घृण हत्या

पंढरपुरात मठामध्ये रक्ताचा सडा, मठाधिपतींची निर्घृण हत्या

मठाच्या मठाधिपती पदावरून वाद होता. अशातच आज कराडकर महाराज मठात एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली

  • Share this:

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 07 जानेवारी :  पंढरपुरातील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मठाधिपतीच्या वादातून जयवंत पिसाळ यांचा खून झाल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे.

पंढरपूर येथे राज्यातील अनेक महाराजांचे मठ आहेत. यातील कराड येथील कराडकर महाराज मठामध्ये खून करण्यात आल्याचं समोर आलं आहे. कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ होते. मात्र, या मठाच्या मठाधिपती पदावरून वाद होता. अशातच आज कराडकर महाराज मठात एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. याबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले.

या ठिकाणी मठाधिपती पिसाळ महाराजांचा मृतदेह आढळला. त्यानंतर चौकशी केली असता बाजीराव जगताप आणि जयवंत पिसाळ यांचामध्ये वाद होता. त्यानंतर पोलिसांनी बाजीराव जगताप याला ताब्यात घेतल्यावर खून केल्याची कबुली जगताप याने दिली.

जगताप याने या पूर्वीही कराडमध्ये एकजणाच्या डोक्यात वीणा घातली होती.   या प्रकरणी बाजीराव जगताप याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

असं असलं तरी शहारातील मठाधिपती यांचा खून आणि मठातील वाद चव्हाट्यावर आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

पत्नी जेवणाचं विचारलं, आईने 3 वर्षांच्या पोटच्या मुलीला साडीने दिला गळफास

दरम्यान, वाशिम जिल्ह्यात आपल्या पोटच्या 3 वर्षीय लेकीला  एका आईने गळफास दिल्याची मन सुन्न करणारी घटना मंगरुळपिर तालुक्यातील जनुना शिवारात घडली आहे.

मंगरुळपीर तालुक्याच्या जनुना गावातील अमोल भगत आणि गायत्री भगत या दाम्पत्याला तीन मुली होत्या. सर्वात मोठी समीक्षा भगत ( 8 ), मधली तनीक्षा भगत ( 3 ) आणि लहानी प्रांजली भगत ( 2 ) अशी त्यांची नावे आहेत.आज जिल्हा परिषेदेसाठी मतदान होत असल्याने गायत्री भगत या महिलेचा पती अमोल भगत हा मतदानासाठी जात असतांना त्यानं गायत्रीला स्वयंपाकाविषयी विचारलं होतं.

त्याचा राग मनात ठेवून तिने मुलगी तनिक्षा भगत ( 3 )ला सोबत घेऊन मतदान करायला जाते म्हणून निघाली. गावाबाहेर गेल्यानंतर या निर्दयी आईने आपला राग लेकीवर काढला. रस्त्यालगत असलेल्या एका झाडाला तिने  पोटच्या लेकीला साडीने गळफास दिला. गळफास देऊन मुलीचा मृत्यू होईपर्यंत ती तिथेच उभी होती. काही क्षणात 3 वर्षांच्या तनिक्षाने जीव सोडला. तनिक्षाने जीव सोडल्यानंतर गायत्री भानावर आली. आपल्या हातून काय घडलं हे पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे गायत्रीने त्याच साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नेमकं त्यावेळी गावकरी धावून आल्याने तिचा प्रयत्न फसला.

अगदी क्षुल्लक कारणामुळे तिने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं. गायत्री भगत ही महिला अधून मधून मानसिक रोगी असल्यागत वागत असल्याचं गावकऱ्यांमध्ये चर्चा होती.

या मन सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला आहे. गायत्री भगत या आईने पोटच्या मुलीला का गळफास देऊन मारले, याचा तपास मंगरुळपिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद दिघोरे हे करत आहेत.

केवळ पतीनं विचारलं म्हणून या महिलेनं आपल्या मुलीला फाशी देऊन मारल्याने आई मुलीच्या नात्याला काळीमा फासल्या गेली असून माता न तू वैरीणी अशी म्हणण्याची वेळ या घटनेमुळे येऊन ठेपली आहे.

First published: January 7, 2020, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading