मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pandharpur Election Result: अभिजीत बिचुकलेला चंबूगबाळ गुंडाळावं लागणार; डिपॉझिट जप्त होणं निश्चित

Pandharpur Election Result: अभिजीत बिचुकलेला चंबूगबाळ गुंडाळावं लागणार; डिपॉझिट जप्त होणं निश्चित

Pandharpur Election Result 2021 : पुन्हा पुन्हा आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांची सकाळपासून धूळधाण उडाली आहे. त्यांना मतमोजणीच्या अखेरपर्यंत किमान 100 मतंही मिळणं अशक्य वाटतं आहे.

  • Published by:  News18 Desk
पंढरपूर, 02 मे: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Assembly election 2021) मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत 25 व्या फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार  समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांनी तब्बल 6200 मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) पिछाडीवर आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणूकीत एकूण 19 उमेदवारांचा भवितव्य टांगणीला लागलं आहे. समाधान अवताडे आणइ भगीरथ भालके वगळता, इतर उमेदवारांना 1 हजार मतांचाही टप्पा पार करता आला नाही. विशेष म्हणजे पुन्हा पुन्हा आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांना 19 व्या फेरी अखेर केवळ 54 मतं मिळाली आहेत. मराठी बीग बॉस या रिअॅलिटी शो मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिजीत बिचुकले यांनी यापूर्वी वरळी विधानसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. बिचुकलेंनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात अचानक उडी घेतल्यानं निवडणुकीला एक वेगळी रंगत आली होती. हे ही वाचा- 'अभिजीत बिचुकले मनोरुग्ण, त्याला चपलेने हाणला पाहिजे' Megha Dhade ही निवडणूक आपणचं जिंकणार, असा विश्वासही बिचुकले यांनी अनेकदा माध्यमांत बोलून दाखवला आहे. असं असताना सध्या त्यांना आपलं डिपॉझिटही वाचवता येत नाहीये. त्यांच डिफॉझिट जप्त होणं जवळपास निश्चित झालं असून त्यांना आता लवकरचं आपलं चंबूगबाळ गुंडळावं लागणार आहे. 19 व्या फेरी अखेर त्यांना अवघी 54 मतं मिळाली आहेत. त्यामुळे निकाल लागेपर्यंत किमान तीन आकडी संख्याही गाठता येते का नाही, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
First published:

Tags: Assembly Election 2021, Pandharpur

पुढील बातम्या