पंढरपूर, 07 एप्रिल: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषद सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona positive) आली आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतील (Pandharpur Election) अनेक प्रचारसभांना आणि मेळाव्यांना उपस्थिती दर्शवली आहे. त्यांच्या संपर्कात अनेक कार्यकर्ते आणि मतदार आल्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खरंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा रणजीतसिंह मोहिते पाटलांकडे आहे. अशात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती स्वतः रणजीतसिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
यावेळी त्यांनी म्हटलं कि, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी क्वारन्टाइन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे कि, त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी.'
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रणजीतसिंह मोहिते पाटील प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघ पिंजून काढत आहेत. दरम्यान त्यांनी अनेक मोठ्या मेळाव्यांना आणि सभांना हजेरी लावली आहे. अलीकडेच ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे आणि भाजपचे प्रमुख प्रचारक प्रशांत परिचारक यांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक कार्यकर्त्यांची आणि मतदारांची धाकधूक वाढली आहे.
हे ही वाचा- पंढरपूर पोटनिवडणूक : शरद पवारांनी अखेर निर्णय घेतला, भगीरथ भालकेंना उमेदवारी जाहीर
पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचं निधन झालं. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका घेतल्या जात आहे. या मतदार संघात राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना, भाजपच्या प्रमुख नेत्याला कोरोनाची लागण झाल्यानं याचा निडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Corona spread, Covid-19 positive, Pandharpur news