पत्नीच्या बदनामीमुळे शेजाऱ्याने बेदम मारलं, आता डोक्यात दगड घालून घेतला बदला

पत्नीच्या बदनामीमुळे शेजाऱ्याने बेदम मारलं, आता डोक्यात दगड घालून घेतला बदला

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली.

  • Share this:

पंढरपूर, 23 मे : सांगोला शहरात मित्राने मोबाईलच्या कारणावरून झोपेत असताना खून केल्याची घटना ताजी असताना आज पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव संतोष सुरेश कपणे असे आहे.

संतोष सुरेश कपणे (वय 31, रा. सरकोली, ता. पंढरपूर) हे घराच्या बाहेर झोपले असताना त्यांच्या डोक्यामध्ये अज्ञात इसमाने दगड मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

खुनाच्या उलगड्यानंतर हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

सरकोली ता. पंढरपूर येथील संतोष सुरेश कपणे (वय 36 )याचा गुरुवारी रात्री खून करून आरोपी पसार झाला होता. या खुनातील आरोपी विनोद लक्ष्‍मण भोसले (वय 27) यास पोलिसांनी काही तासांतच अटक केली. आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी विनोद भोसले हा अविवाहित आहे. तो कपने यांच्या घराशेजारीच राहात आहे. त्याची स्वतःच्या मालकीची एक गाडी असून तो जीपभाडे करून उदरनिर्वाह करीत आहे. मयत संतोष कपणे याने वर्षभरापूर्वी माझ्या पत्नीची तू बदनामी करतोस म्हणून ओझेवाडी येथील पठाण साहेब माळावर आरोपीस बोलवून घेऊन बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली होती. या मारहाणीचा राग आरोपी विनोद भोसले याच्या मनात होता.

संतोष कपने हा दूध व्यवसाय करत असून गुरुवारी सायंकाळी जेवण करून कामाचा कंटाळा आल्याने घरासमोरील कट्ट्यावर झोपला होता. आरोपी शेजारीच राहत असल्याने एकटा झोपलेल्या संतोषचा काटा काढायचा म्हणून परिस्थितीचा अंदाज घेतला. रात्री एकच्या दरम्यान डोक्यात दगड घालून खून करून पसार झाला. दररोज दूध व्यवसायासाठी पहाटे उठणारा संतोष आणखी कसा उठेना म्हणून आई उठवण्यास गेली असता संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

समोरचे चित्र पाहून आई ओरडली असता घरातील व शेजारील लोक गोळा झाले. जिवंत असेल या आशेने त्यास पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलीस निरीक्षक किरण अवचार साहेब यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाची चक्रे फिरवली असता काही तासातच आरोपी विनोद भोसले यास अटक केली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने सरकोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published: May 23, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading