पैशांसाठी भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवलं, भाच्याचा मृत्यू, भाऊ-वहिनी जखमी

पैशांसाठी भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवलं, भाच्याचा मृत्यू, भाऊ-वहिनी जखमी

सख्ख्या भावानेच भावाचं पेट्रोल टाकून पेटवलं कुटुंब, मंगळवेढ्यातील घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण.

  • Share this:

वीरेंद्र उत्पात (प्रतिनिधी) पंढरपूर, 08 नोव्हेंबर: सख्खा भाऊच वैरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कर्ज फेडण्यासाठी भाऊ पुढाकार घेत नाही या कारणावरून चिडून सख्ख्या भावानेच भावाचा संपूर्ण कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना मंगळवेढ्यातील महंमदाबाद इथे घटली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. यामध्ये 12 वर्षीय मुलाचा जास्त भाजल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोपान रामचंद्र घुंबरे (वय 45)आणि सोनाबाई सोपान घुंबरे (वय 40)हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी आरोपी भाऊ लक्ष्मण घुंबरेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सख्खा भाऊ का झाला वैरी? नेमकं काय घडलं?

06 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 च्यासुमारास सोपान घुंबरे आणि त्यांच्या पत्नी सोनाबाई मुलासह दार आड करून घरात गाढ झोपले होते. आपला भाऊ कर्जफेडण्यासाठी पुढाकार घेत नसल्याच्या रागातून आरोपीने प्लॅस्टीकच्या पिशवीतील पेट्रोल भावासह पत्नीच्या अंगावर ओतले आणि पेटवून दिलं. घरात आगीचे लोळ उठले आणि वाचवण्यासाठी भावाकडे मदत मागितली मात्र भाऊ तिथून पसार झाला. जास्त भाजल्यामुळे सोपान घुंबरे यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला रेशनिग कार्ड वेगवेगळे करण्याकरीता हलचाल न केल्यानं आणि कर्ज फेडण्यासाठी पुढाकार न घेतल्याच्या रागातून हा सगळा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. दरम्यान आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.

55 वर्षांचा तो 19 वर्षीय युवतीला दररोज छेडायचा, महिलांनी चोप देत काढली धिंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या