मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कुठे गेले गोरक्षक? ही गोशाळा की कत्तलखाना?

कुठे गेले गोरक्षक? ही गोशाळा की कत्तलखाना?

भुकेने व्याकुळ झालेल्या या गाईंचं कपडे आणि कागदांचे तुकडे खाणं, सर्वत्र पसरलेले शेणाचे ढीग, चिखलाचा राडारोडा अन मेंदूला झिणझिण्या आणणारी दुर्गंधी हे दृश्य आहे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील

सुनील उंबरे, पंढरपूर, 29 जून : भुकेने व्याकुळ झालेल्या या गाईंचं कपडे आणि कागदांचे तुकडे खाणं, सर्वत्र पसरलेले शेणाचे ढीग, चिखलाचा राडारोडा अन मेंदूला झिणझिण्या आणणारी दुर्गंधी हे दृश्य आहे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील आणि या गाई, भक्तांनी भक्तिभावानं मंदिराला दिलेलं दानं आहेत. रखुमाईला भरलेल्या खणानारळाच्या ओटीतील खण आज या गाईंचे खाद्य बनलेत. एखादा भाविक जेव्हा मंदिराला गाय दान करतो तेव्हा त्या मागची त्याची श्रद्धा असते आपण दिलेल्या गाईचे दूध देवाच्या अभिषकासाठी वापरले जावे. पण या गाईंचं बहुतांश दूध हे मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि दर्शनाला आलेल्या व्हीव्हीआयपी भक्तांच्या चहापानासाठी वापरलं जातं. या गोशाळेत कधी काळी पाचशेहून अधिक गाई होत्या.  मात्र मंदिर समितीच्या निष्काळजी कारभारामुळे बहुतांश गाई प्लास्टिक पिशव्या, कपडे, चपला खाऊन मृत पावल्या आहेत.अशा वेळी तथाकथित गोरक्षक आणि गो रक्षणाबद्दल बोलणारे कुठे गेलेत असा प्रश्न भाविक विचारताहेत. हेही वाचा हिमाचलमध्ये जोरात पाऊस, रावीचं रौद्र रूप VIDEO : पळा पळा बिबट्या आला! औरंगाबादमध्ये शिवारातच धुमाकूळ पुन्हा एकदा पाकिस्तानच्या 'चांद नवाब' यांचा व्हिडिओ झाला व्हायरल  
First published:

Tags: Cow, Goshala, Pandharpur, Viththal temple, गाय, गोशाला, पंढरपूर, विठ्ठल मंदिर

पुढील बातम्या