Pandharpur by-election : अजितदादांपाठोपाठ रोहित पवारांचीही सभा हाऊसफुल्ल, VIDEO

Pandharpur by-election : अजितदादांपाठोपाठ रोहित पवारांचीही सभा हाऊसफुल्ल, VIDEO

कोरोनाचे सर्व नियम झुगारून रोहित पवार यांची सभा याठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, या सभेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी लॉकडाऊन लागल्यास सरकारनं सर्वसामान्यांची काळजी घ्यावी असं वक्तव्यही केलं.

  • Share this:

पंढरपूर, 11 एप्रिल : पंढरपूरच्या पोट निवडणुकीत (Pandharpur by-election 2021) प्रचारादरम्यान पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या सभेत गर्दी झाल्याचे आरोप होते. तर तर यावेळी पुत्यण्या आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांच्या सभेला गर्दी झाली होती.

पंढरपुरात दिवंगत आमदार भारल भालके यांच्या अचानक निधनानंतर होणारी पोटनिवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आहे. या पोटनिवडणुकीत राज्यात सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनीच प्रचारादरम्यान कोरोनाच्या (Cororna) नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप झाला आहे. त्यात आता रोहित पवार यांच्या नावाचाही समावेश झालाय. रोहित पवार यांची रविवारी पंढरपुरात सभा झाली. पंढरपूरच्या कालिका देवी चौकात झालेल्या या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम झुगारून रोहित पवार यांची सभा याठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या सभेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी लॉकडाऊन लागल्यास सरकारनं सर्वसामान्यांची काळजी घ्यावी असं वक्तव्यही केलं.

वाचा -Beed News : बीड जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 28 कैदी पॉझिटिव्ह!

पंढरपूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांची सभा झाली होती. त्या सभेमध्ये प्रचंड गर्दी जमवल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यानंतर अजित पवार यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हादेखिल दाखल करण्यात आला होता. मात्र असं असतानाही रोहित पवार यांनी सभा घेतल्यानं, कोरोनाच्या नियमांशी नेत्यांना काही देणं घेणं नसल्याचं दाखवून दिलंय.

वाचा - BREAKING : मोदी सरकारचा मोठा निर्णय, रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे अचानक निधन झाल्यानं त्याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान औताडे असा थेट सामना रंगणार आहे. ही निवडणूक दोन्ही बाजुंसाठी अत्यंत चुरशीची अशी बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर भाजपनंही पूर्ण जोर लावला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 11, 2021, 7:47 PM IST

ताज्या बातम्या