पंढरपूर, 29 मार्च : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीला (Pandharpur-Mangalvedha constituency by-election) रंगत आली आहे. अखेर एकदिवसाआधी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भारत भालके (Bharat Bhalke) यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागले होते. अखेर राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भगीरथ भालके हे उद्या मंगळवारी आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहे.
आता करचोरी अशक्य! 1 एप्रिलपासून आयकर भरण्यासाठी लागू नवा नियम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. अखेर मुलाच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सूर्या'स्त झाला असता, पण लॉकडाऊनमध्ये या मित्राने बदललं सूर्यकुमारचं आयुष्य
तर दुसरीकडे भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समाधान आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी 30 मार्च ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 31 मार्च नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. त्यामुळे उद्या दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: पंढरपूर, राष्ट्रवादी