मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

pandharpur by-election : 'राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो', फडणवीसांची तुफान टोलेबाजी, VIDEO

pandharpur by-election : 'राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो', फडणवीसांची तुफान टोलेबाजी, VIDEO

'महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केले आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे.

'महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केले आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे.

'महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केले आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे.

पंढरपूर, 12 एप्रिल : पंढरपूर पोटनिवडणुकीचा (pandharpur by-election 2021)भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) चांगलाच आखाडा तापला आहे. 'पंढरपूरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून देऊन तुम्ही यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो' अशी तुफान फटकेबाजी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी केली.

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समर्थनार्थ पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विराट सभा पार पडली. यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला.

'महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केले आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे. पंढरपूरकरांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊन यांचा कार्यक्रम करावा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो', असं म्हणत राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला.

चहावाला ते पंतप्रधान; मोंदीच्या प्रवासामुळे भारावलेली चहावाली निवडणूक रिंगणात

तसंच, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसाची गरज लागत नाही. सरकार बदलण्यासाठी निवडणुकीची गरज नाही. सरकार कधीही बदलू शकतो, असा विश्वासही फडणवीस यांनी बोलून दाखवला.

त्याआधी दुपारी झालेल्या आणखी एक सभेत फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला.

नुसरत जहाँचा इंटरनेटवर धुमाकूळ; निवडणूक संपताच केलं बोल्ड फोटोशूट

'संजय राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. केंद्राने सर्वात जास्त पीपीई कीट, सर्वात जास्त मास्क, सर्वात जास्त लसी राज्याला दिल्या. एकीकडे सरकार कडून पत्रकं काढली जात आहे. महाराष्ट्र लसीकरणामध्ये अव्वल आहे. जर अस असेल तर मग या लशी कुठून पैदा झाल्या. या लशी केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

'आम्ही राजकारण करत नाही. आम्ही मदत करायला निघालेलो आहे. पण तुमचा जो उठतो तो सोम्यागोम्या केवळ राजकारण करतो. कोरोनाच्या नावाने हे योग्य नाही, असं म्हणत फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला.

First published: