मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडे मैदानात, शरद पवार कुणाचे नाव करणार जाहीर?

पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडे मैदानात, शरद पवार कुणाचे नाव करणार जाहीर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली.

पंढरपूर, 29 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक (Pandharpur-Mangalvedha constituency by-election) जाहीर झाली आहे. त्यानंतर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपकडून (BJP) समाधान महादेव आवताडे (Samadhan avtade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीकडून उमेदवार ठरत नसल्यामुळे घोळ निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत उडी घेतली आहे. भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

100 पैकी 20 बळी; नागपुरात कोरोना मृत्यूचा भीषण आकडा, धक्कादायक कारण समोर

समाधान आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली.

पाकिस्तानात होळीला गालबोट, 100 वर्ष जुन्या मंदिरावर हल्ल्याची घटना उघड

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

कुणाची नावे चर्चेत!

या पोटनिवडणुकीत संभाव्य उमेदवारांमध्ये काही दिवसांपासून युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, शिवसेना महिला नेत्या शैला ताई गोडसे, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे नाव मागील काळात चर्चेत आहे.

IPL 2021 : इंजिनियर असलेल्या या फास्ट बॉलरने केलंय दिग्गजांना प्रभावित

या निवडणुकीसाठी 30 मार्च ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 31 मार्च नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. त्यामुळे राष्ट्रवादीकडे एकच दिवस उरला आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता राष्ट्रवादीच्या घोषणेकडे लागले आहे.

First published: