मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आम्हाला जिंकण्यासाठी पावसातील सभेची गरज नाही', फडणवीसांचा पवारांना टोला

'आम्हाला जिंकण्यासाठी पावसातील सभेची गरज नाही', फडणवीसांचा पवारांना टोला

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, वीजबिल वसुली, शेतकऱ्यांना मदत, आरक्षण अशा अनेक मुद्द्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मात्र त्यांनी पावसातील सभेबाबत केलेल्या वक्तव्याची सगळीकडं चर्चा आहे.

पंढरपूर, 12 एप्रिल : पंढरपूर येथील पोटनिवडणूक (pandharpur by-election 2021) ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) दोघांनीही प्रतिष्ठेची बनवली आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही बाजुंनी जंग जंग पछाडले जात आहे. प्रचारातही दोन्ही पक्ष एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सोमवारी पंढरपुरात जोरदार प्रचार केला. यावेळी प्रचारसभेत त्यांनी 'आपल्याला जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नसल्याचं' वक्तव्य करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना टोला लगावला.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बोराळे, नंदेश्वर आणि मंगळवेढा याठिकाणी प्रचारसभांना संबोधित केलं. त्यानंतर पंढरपूरमध्ये टिळक स्मारक मैदानावरही देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेच्या वेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ असल्याचं म्हटलं होतं.

त्यावर फडणवीस म्हणाले की, 'आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घेण्याची गरज नाही, तशी गरजही आपल्याला लागत नाही. सरकार बदल्यासाठी आम्हाला निवडणुकीची गरज नाही, जेव्हा सरकार बदलायचे असेल तेव्हा बदलून दाखवू.'

राज्यात सत्तापालट होण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शरद पवारांच्या सभेच्यादरम्यान पाऊस आला होता. भर पावसात शरद पवारांनी सभा घेतली. त्या एका सभेनं वातावरण बदलल्याची चर्चा होती. त्या सभेच्या संदर्भावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं.

(वाचा-BREAKING : 'अनिल देशमुख हाजीर हो', अखेर सीबीआयने बोलावलं चौकशीला!)

'सरकार कधीही बदलू शकतो'

पंढरपूरची निवडणूक राज्याला नवी दिशा देणारी असेल. सरकार बदलण्यासाठी आम्हाला निवडणुकीची गरज नाही, जेव्हा बदलायचं असेल तेव्हा सरकारही बदलून टाकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला. सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढल्यानंतर सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचं फडणवीस म्हणाले.

(वाचा - भाजपकडून राज्याला 50 हजार remdesivir injection देण्याची घोषणा)

संजय राऊतांवर टीका

यापूर्वीच्या सभेत बोलताना फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. केंद्र सरकारकडून राज्याला सर्वाधिक मदत म्हणून पत्रक काढलं जातं. दुसरीकडे कोणीही सोम्यागोम्या उठून काहीही बोलतात, असं फडणवीस म्हणाले. संजय राऊत काहीही बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. केंद्राने सर्वात जास्त पीपीई कीट, सर्वात जास्त मास्क, सर्वात जास्त लसी राज्याला दिल्या, असं फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, वीजबिल वसुली, शेतकऱ्यांना मदत, आरक्षण अशा अनेक मुद्द्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मात्र त्यांनी पावसातील सभेबाबत केलेल्या वक्तव्याची सगळीकडं चर्चा आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Sharad pawar