Home /News /maharashtra /

फॉर्च्युनर गाडी पलटली, भीषण अपघातात प्रसिद्ध उद्योजकाचा जागीच मृत्यू

फॉर्च्युनर गाडी पलटली, भीषण अपघातात प्रसिद्ध उद्योजकाचा जागीच मृत्यू

कामानिमित्त मित्रांसोबत बाहेरगावी गेलेल्या सागर दोषी यांचा घरी परतत असताना अपघात झाला.

    वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 13 जानेवारी : पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी यांचे अपघातात (Accident) निधन झाले आहे. कामानिमित्त मित्रांसोबत बाहेरगावी गेलेल्या सागर दोषी यांचा घरी परतत असताना अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी पलटली. या भीषण अपघातात सागर दोषी यांच्या जागेवरीच मृत्यू झाला. पंढरपूर (Pandharpur) येथील महालक्ष्मी मसालेचे मालक अशोक दोशी यांचे सुपुत्र सागर दोशी यांनी नुकतीच महालक्ष्मी फर्निचरच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली होती. सागर दोशी आणि मित्र परिवार कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. परतीच्या प्रवासात उशीर झाल्याने ते पंढरपूर- मोहोळ रोडवरील साईराज हॉटेल येथे जेवण्यासाठी थांबले होते. संक्रांतीला माहेरी न पाठवल्याने विवाहितेची आत्महत्या, 8 महिन्यांपूर्वी झाला विवाह जेवणानंतर परतताना फॉर्च्युनर गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी 4 पलट्या घेऊन आदळली. त्यामध्ये सागर दोशी गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. गाडीतील 4 व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर दोशी यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा पंढरपुर शहरात चांगला संर्पक होता. खंडणीसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, पुणे विद्यापीठ परिसरात फेकला मृतदेह सागर दोशी यांना बाईक रायडिंगचाही छंद होता . मित्र परिवाराबरोबर सागर यांनी लेह -लडाख आणि कन्याकुमारीपर्यंत बाईकवर प्रवास केला होता. काही वर्षातच सागर दोशी यांनी यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली असतानाच अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pandharpur

    पुढील बातम्या