धक्कादायक! शिक्षकच झाले हल्लेखोर, शाळेच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला

धक्कादायक! शिक्षकच झाले हल्लेखोर, शाळेच्या संस्थापकावर जीवघेणा हल्ला

थेट संस्थापकावरच झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 11 फेब्रुवारी : टेंभुर्णी येथील संत रोहिदास प्राथमिक आश्रमशाळेच्या आणि जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सातपुते यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेतील 5 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेट संस्थापकावरच झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कैलास सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कपिल राजाराम रामगुडे , अनिल शंकर लोकरे , जगन्नाथ सौदागर कांबळे, पांडुरंग विश्वनाथ भंडारी व प्रकाश दशरथ रेवे यांच्यावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात कलम 307,435,341,352 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फिर्याद दिलेल्या घटनेनुसार कैलास सातपुते आणि त्यांचा मित्र विकी लो़ंढे हे दोघे सातपुते यांचे मित्र दादासाहेब लोंढे यांच्या घरून जेवण करून परतत होते. त्यावेळी टेंभुर्णी-बेंबळे रोडवरील मुळे वस्तीजवळ वरील संशयित पाच आरोपींनी कैलास सातपुते यांची गाडी अडवून त्यांना खाली खेचले व शाळेतील माधुरी तरटे यांची विभागीय चौकशी मागे घ्यावी आणि शिपाई प्रमोद लोकरे व जगन्नाथ कांबळे यांच्या बनावट सेवा पुस्तकावर सह्या करण्याच्या कारणावरून दमदाटी केली.

लग्नाच्या तीन दिवस आधीच तरुणीने प्रियकरासोबत गळफास लाऊन संपवलं आयुष्य!

पांडुरंग भंडारी यांनी चाकुने सातपुते यांच्या गळ्यावर ,डाव्या दंडावर व पाठीवर वार केले. सातपुते यांचे मित्र विकी लो़ंढे त्यांना वाचवण्यासाठी आले असता जगन्नाथ कांबळे व प्रकाश रेवे या़नी त्यालाही मारहाण केली व लोंढे यांची मोटारसायकल पेटवून देण्यात आली. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या कैलास सातपुते व विकी लो़ंढे यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या शेतात पळ काढला व सातपुते यांचा मुलगा शुभम सातपुते याला सदरचा घडलेली घटना फोन करून सांगितली.

शुभम सातपुते आणि त्यांचा मित्र सुमित खरात यांनी जीपमधून जाऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी कैलास सातपुते व विकी लो़ंढे यांना इंदापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सातपुते यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून टे़भूर्णी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published: February 11, 2020, 6:14 PM IST
Tags: pandharpur

ताज्या बातम्या