• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पंढरपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान, चुरशीच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

पंढरपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान, चुरशीच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) तर महायुतीचे समाधान आवताडे (Samadhan Avtade) हे रिंगणात आहेत.

  • Share this:
पंढरपूर, 17 एप्रिल : राज्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया (Pandharpur assembly constituency by election voting) सुरू झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) तर महायुतीचे समाधान आवताडे (Samadhan Avtade) हे रिंगणात आहेत. तसंच स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे यांनीही जोरदार आव्हान दिलं आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. मतदारसंघात 524 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र, तर 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशीन असणार आहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आले.. मतदारसंघात 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. हेही वाचा - बंगालमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर! मतदानाच्या तारखांबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस व तीन इतर गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून होते. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही समाधान आवताडे यांचा विजय होण्यासाठी जिवाचं रान केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाला पसंती दाखवणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: