मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pandharpur पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का, उमेदवार समाधान आवताडेंच्या घरातच पडली फूट

Pandharpur पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का, उमेदवार समाधान आवताडेंच्या घरातच पडली फूट

या मतदारसंघात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदारसंघात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

या मतदारसंघात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

पंढरपूर, 3 एप्रिल : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या (Pandharpur Assembly by-election) मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना मात्र मोठा धक्का (set back for BJP candidate Samadhan Avtade) बसला आहे. कारण आवताडे यांच्यासमोर आता त्यांच्या घरातूनच आव्हान उभं राहिलं आहे.

समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने समाधान आवताडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्धेश्वर आवताडेंनी समजूत काढण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे समाधान आवताडेंसमोर मतविभागणीचे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

हेही वाचा - 'हा तर धक्कादायक विनोद', मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना बरसली!

कोण आहेत सिद्धेश्वर आवताडे?

सिद्धेश्वर आवताडे यांचाही मतदारसंघात चांगलाच संपर्क आहे. त्यांच्या ताब्यात मंगळवेढ्यातील जवळपास 50 ग्रामपंचायती, तसंच शेतकऱ्यांना पत पुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांवर त्यांचं वर्चस्व आहे. सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने भाजपची मात्र अडचण निर्माण झाली आहे. आज 3 एप्रिल अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. सिद्धेश्वर आवताडे यांनी आज शेवटच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्यास समाधान आवताडेंसाठी ही निवडणूक आणखी खडतर होऊ शकते.

भाजपच्या प्रयत्नांवर पाणी?

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने परिचारक आणि आवताडे गटाला एकत्र आणत अनोखी खेळी केली होती. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले परिचारक आणि आवताडेंना एकत्र करीत भाजपने समाधान आवताडेंना निवडणूक रिंगणात उतरवलं. परिचारक आणि आवताडे गट एकत्र आल्याने भाजपला ही निवडणूक सोपी जाईल असे आडाखे बांधले जात होते. मात्र आता समाधान आवताडे यांना घरातूनच आव्हान मिळाल्याने ही निवडणूक पुन्हा रंगतदार झाली आहे.

First published:

Tags: Assembly Election 2021, BJP, Modi government, NCP, Pandharpur, Pandharpur news