मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Assembly constituency by-election Date) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Assembly constituency by-election Date) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या (Pandharpur Assembly constituency by-election Date) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पंढरपूर, 16 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि पंढरपूरचे आमदार दिवंगत भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly constituency by-election Date) 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादीने (NCP) अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नसल्याने पंढरपूरची निवडणूक चुरशीची होत चालली आहे. या निवडणुकीसाठी 30 मार्च ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर 31 मार्च नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. त्यामुळे पुढील काही दिवसांतच राष्ट्रवादीसह अन्य पक्ष आपले उमेदवार घोषणित करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून कोण-कोण आहे उमेदवारीच्या स्पर्धेत?

या पोटनिवडणुकीत संभाव्य उमेदवारांमध्ये काही दिवसांपासून युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, दामाजी सहकारी साखर करखान्याचे चेअरमन व आवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे ,शिवसेना महिला नेत्या शैला ताई गोडसे, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे नाव मागील काळात व आताही चर्चेचे केंद्र बनलेलं आहे.

हेही वाचा - राज्य मंत्रिमंडळातील आणखीन 2 मंत्र्यांचे राजीनामे? चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरात गौप्यस्फोट

या सर्व नेतेमंडळींनी मोर्चे बांधणी अतिशय मजबूत करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये भगीरथ भालके यांनी नुकतीच काढलेली 'जनसंवाद यात्रा' तर दुसऱ्या बाजूला समाधान आवतडे यांनी काढलेली 'सुसंवाद यात्रा', अभिजीत पाटील यांच्याकडून सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धा, तसंच विविध सामाजिक उपक्रम या सर्व माध्यमातून या नेतेमंडळींची जनतेच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

दरम्यान, शरद पवार या जागेवर राष्ट्रवादीची उमेदवारी नक्की कोणाला देणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून लवकरच पक्षाकडून याबाबतची भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Pandharpur, Pandharpur news