मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपुरात दाखल होताच राष्ट्रवादीवर बरसले देवेंद्र फडणवीस, ठाकरे सरकारवर नवा गंभीर आरोप

पंढरपुरात दाखल होताच राष्ट्रवादीवर बरसले देवेंद्र फडणवीस, ठाकरे सरकारवर नवा गंभीर आरोप

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी पंढरपुरात पोहोचताच महाविकास आघाडीवर घणाघाती आरोप केले आहेत.

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी पंढरपुरात पोहोचताच महाविकास आघाडीवर घणाघाती आरोप केले आहेत.

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी पंढरपुरात पोहोचताच महाविकास आघाडीवर घणाघाती आरोप केले आहेत.

पंढरपूर, 12 एप्रिल: पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Pandharpur assembly by election) सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपच्या नेतृत्त्वाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. अशातच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी पंढरपुरात पोहोचताच महाविकास आघाडीवर घणाघाती आरोप केले आहेत.

'सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भात आयोग स्थापन करण्याची सूचना केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने आयोग नेमला नाही. त्यामुळे या नालायक महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगरपालिकेतील ओबीसी, व्हीजेएटी या समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे भविष्यात या समाजाचे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण धोक्यात येईल, अशी भीती आहे,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

हेही वाचा - 'रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?', प्रवीण दरेकर राष्ट्रवादीला थेट भिडले

पंढरपूरच्या प्रचारसभेत फडणवीसांची चौफेर फटकेबाजी, जाणून घ्या ठळक मुद्दे

- ही एका मतदारसंघाची निवडणूक, जनतेला संधी मिळाली....राज्य सरकारचा दुराचार चव्हाट्यावर आणून आपली नापसंती दाखवता येणार आहे.

- लोक हिताच्या विरोधी हे सरकार आहे , सत्तेवर आलं तेव्हा हे महाविकास आघाडी सरकार होतं. पण आता हे महावसुली सरकार आहे.

- जिथे मिळेल तिथे फावड्याने माल खा एवढंच काम

- देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आहेत

- एकट्या महाराष्ट्रात 55 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहेत.

- लॉकडाऊन करताना ज्यांचे पोट बंद होतं त्यांना मदत करणं गरजेचं आहे, छत्तीसगड राज्याने तेथील शेतकऱ्यांना मदत केली

दरम्यान, भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी धनगर, मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.

मंगळवेढ्यात तालुक्यातील दुष्काळी 35 गावांचा शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातून मदत आणून या भागातील पाणी प्रश्न सोडवू, असं आश्वासनंही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांना दिलं.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, NCP, Pandharpur news