Pandharpur Assembly by-election : पंढपुरात कोण मारणार बाजी? मतमोजणी झाली सुरू

Pandharpur Assembly by-election : पंढपुरात कोण मारणार बाजी? मतमोजणी झाली सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

  • Share this:

पंढरपूर, 02 मे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly by-election ) आज मतमोजणी होणार आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यात मुख्य लढत पाहण्यास मिळाली असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोरोना चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांनाच मतमोजण केंद्रावर प्रवेश देण्यात आला आहे.  उमेदवार प्रतिनिधींना पीपीकीटची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 3500 टपाली मतदान प्राप्त झाले आहे.

पाणी पेटलं! किर्गिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर पाण्यासाठी हिंसाचार; 31 मृत्यूमुखी

मतमोजणी टेबलवर नियुक्त असलेले अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझर (Sanitizer), मास्क (Mask), फेसशिल्ड (Face shield), पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. यासोबतच मतमोजणी कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मतमोजणीबाबत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रात सर्वत्र औषध फवारणी करुन घेण्यात आली आहे. मतमोजणी केद्रात विद्युत जोडण्यात कुठेही शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Published by: sachin Salve
First published: May 2, 2021, 7:30 AM IST

ताज्या बातम्या