मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूरमध्ये राजू शेट्टी वाढवणार राष्ट्रवादीच्या अडचणी? थेट नेतृत्त्वाला विचारला तिखट सवाल

पंढरपूरमध्ये राजू शेट्टी वाढवणार राष्ट्रवादीच्या अडचणी? थेट नेतृत्त्वाला विचारला तिखट सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मतदारसंघामध्ये तळ ठोकलेला आहे.

पंढरपूर, 4 एप्रिल : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (Pandharpur assembly by election) राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके (NCP Bhagirath Bhalke) यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आता खुद्द स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपला उमेदवार विजयी करण्यासाठी मतदारसंघामध्ये तळ ठोकलेला आहे.

या पोटनिवडणुकीच्या प्रचारात राजू शेट्टी हे आक्रमकपणे भाजपसह महाविकास आघाडीलाही घेरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावे. शेतकरी संघटना आता सरकारच्या अपयशावर बोट ठेवणार आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

हेही वाचा - PM मोदी...लॉकडाऊन आणि भीतीच्या भिंती, संजय राऊतांनी 1 वर्षाचा इतिहासच मांडला!

जयंत पाटलांना उत्तर, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला विचारला थेट सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आमच्या मागण्यांचा विचार करण्याबाबत बोलतात. मात्र आधी शेतकऱ्यांची एफआरपी द्या आणि घरगुती वीज बिल माफ करा, हीच आमची मागणी असल्याचे उत्तर राजू शेट्टी यांनी जयंत पाटलांना दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतले होते का? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत हे दुर्दैव आहे, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.

First published:

Tags: Pandharpur, Pandharpur news, Raju Shetti (Politician)