मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pandharpur Assembly by-election : पंढपुरात राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप पडले मागे

Pandharpur Assembly by-election : पंढपुरात राष्ट्रवादी आघाडीवर, भाजप पडले मागे

आता तिसऱ्या फेरीचा कल हाती आला असून 635 मतांनी भगीरथ भालके पुढे आहे. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली आहे.

आता तिसऱ्या फेरीचा कल हाती आला असून 635 मतांनी भगीरथ भालके पुढे आहे. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली आहे.

आता तिसऱ्या फेरीचा कल हाती आला असून 635 मतांनी भगीरथ भालके पुढे आहे. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली आहे.

  • Published by:  sachin Salve
पंढरपूर, 02 मे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly by-election 2021) मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी तिसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे. तर  भाजपचे (BJP) उमेदवार समाधान आवताडे (Samadhan awtade) पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक होत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. पण, आता चित्र पालटले आहे.  दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती.  दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडेंनी घेतली 5 हजार 492  मतं मिळाली होती. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मतं मिळाली. आता तिसऱ्या फेरीचा कल हाती आला असून 635 मतांनी भगीरथ भालके पुढे आहे. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर 635 मतांनी भगीरथ भालके पुढे आहे.तर समाधान आवताडे यांना 7978 मतं मिळाली आहे.  सचिन शिंदे यांना 200 तर शैला गोडसे यांना 140 मतं मिळाली आहे. तसंच  चौथ्या फेरीअखेर सुद्धा भगीरथ भालकेच आघाडीवर आहे.   भगीरथ भालके 11941 तर समाधान आवताडे 11303 यांना मत मिळाली आहे.  भालके हे 638 ने मतांनी आघाडीवर आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोरोना चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांनाच मतमोजण केंद्रावर प्रवेश देण्यात आला आहे.  उमेदवार प्रतिनिधींना पीपीकीटची व्यवस्था करण्यात आली आहे.  मतमोजणी टेबलवर नियुक्त असलेले अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझर (Sanitizer), मास्क (Mask), फेसशिल्ड (Face shield), पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. यासोबतच मतमोजणी कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
First published:

Tags: Assembly Election 2021

पुढील बातम्या