• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Pandharpur Assembly by-election: पंढपुरात डाव पलटला, भाजपने घेतली आघाडी, राष्ट्रवादी पिछाडीवर

Pandharpur Assembly by-election: पंढपुरात डाव पलटला, भाजपने घेतली आघाडी, राष्ट्रवादी पिछाडीवर

भगीरथ भालके यांनी चौथ्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती. पण आता चित्र पालटले आहे. आठव्या फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे.

  • Share this:
पंढरपूर, 02 मे: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly by-election 2021) मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी चौथ्या फेरीपर्यंत आघाडी घेतली होती. पण आता चित्र पालटले आहे. आठव्या फेरीअखेरीस भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक होत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण आता आठव्या फेरी अखेर समाधान आवताडे 2295 मतांनी आघाडीवर आहे. मुंबई विरुद्ध पराभूत झाल्यानं शांत धोनीही संतापला, 'या' खेळाडूंवर ठेवला ठपका त्याआधी दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती.  दुसऱ्या फेरी अखेर आवताडेंना 5 हजार 492  मतं मिळाली होती. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे होते. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली.  तर समाधान आवताडे यांना 7978 मतं मिळाली. तसंच भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. गज्या मारणेच्या 13 साथीदारांना अटक, सापळा रचून आवळल्या मुसक्या; काय आहे प्रकरण? दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोरोना चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांनाच मतमोजण केंद्रावर प्रवेश देण्यात आला आहे.  उमेदवार प्रतिनिधींना पीपीकीटची व्यवस्था करण्यात आली आहे.  मतमोजणी टेबलवर नियुक्त असलेले अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझर (Sanitizer), मास्क (Mask), फेसशिल्ड (Face shield), पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. यासोबतच मतमोजणी कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मतमोजणीबाबत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रात सर्वत्र औषध फवारणी करुन घेण्यात आली आहे. मतमोजणी केद्रात विद्युत जोडण्यात कुठेही शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Published by:sachin Salve
First published: