मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावजवळ पाम तेलाचा टँकर उलटला; तेलावर डल्ला मारण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, पाहा VIDEO

जळगावजवळ पाम तेलाचा टँकर उलटला; तेलावर डल्ला मारण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, पाहा VIDEO

Palm Oil Tanker Accident: एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसह खाद्यतेलाच्या किमती गगनाला भीडत असताना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव याठिकाणी पामतेलाचा टॅंकर उलटल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

जळगाव, 18 जुलै: मागील काही काळापासून देशात इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत. देशात जवळपास सर्वच ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. तर डिझेलच्या किमतीही शंभरीच्या आसपास आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे देशात सरकारवर अनेक स्तरातून टीका केली जात आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं टीका करणाऱ्या लोकाचं खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. देशात खाद्यतेल्याच्या किमतींनी तर दीड शतक केलं आहे. यामुळे नागरिकांच्या स्वयंपाक घरातील बजेट बिघडलं आहे.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलसह खाद्यतेलाच्या किमती गगनाला भीडत असताना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव याठिकाणी पामतेलाचा टॅंकर उलटल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे घोडसगाव याठिकाणी टँकर उलाटल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतचं याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आहे. यामुळे गावातील लोकांनी मिळेल ते भांड हातात घेऊन घटनास्थळी धाव घेत पाम तेलावर डल्ला मारला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

हेही वाचा-मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक उलटल्यानं 20 टन टोमॅटोचा रस्त्यावर खच, वाहतूक ठप्प

हा टॅंकर मध्य प्रदेशातील इंदोर येथील असून पामतेल घेऊन जळगावच्या दिशेनं चालला होता. दरम्यान आज पहाटे टँकर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. हा पामतेलाचा टँकर आझाद पटेल घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे.  रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात हा टँकर उलटल्यानं मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली आहे. त्यामुळे घटनास्थळी पामतेलाचं छोटसं तळं तयार झालं होतं. यामुळे नागरिकांनी मिळेल ते भांडं घेऊन घटनास्थळी धाव घेत तेलावर डल्ला मारला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता, अनेक नागरिक प्लॉस्टिकचे मोठे कॅन, बादल्या भरून पामतेल घेऊन जाताना दिसत आहेत.

First published:

Tags: Jalgaon, Road accident, Viral video.