विजय राऊत, प्रतिनिधी
पालघर, 6 ऑक्टोबर : पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर (Palghar ZP by polls result announced) झाले आहेत. एकूण 15 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने (Shiv Sena) जिंकल्या आहेत. काँग्रेसला मात्र जिल्ह्यात एकाही जागेवर खात उघडता आले नाही. शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं असलं तरी वणई गटातून शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्या चिरंजीवांचा झालेला दारूण प्रभाव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला शिवसेनेकडून वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सत्ताधारी असतानादेखील गावितांना ही जागा राखण्यात अपयश आल आहे. मुख्य लढतीतही रोहित गावित नसल्यानं गावितांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Shivsena MP Rajendra Gavit) यांना धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव झाला आहे. रोहित गावित (Rohit Gavit Defeated in Election) निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या एकूण 15 जागांपैकी सर्वाधिक म्हणजेच पाच जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. भाजपने 4, राष्ट्रवादीने 5 तर माकपने एका जागेवर विजय मिळवला आहे.
विजयी 15 उमेदवारांची नावे आणि पक्ष
शिवसेना
1) सारिका निकम
2) विनया पाटील
3)नीता पाटील
4) अरुण ठाकरे
5) मिताली बागुल
भाजपा
1) पंकज कोरे
2) जोती पाटील
3)सुनील माच्छी
4) संदीप पावडे
राष्ट्रवादी काँग्रेस
1) हबिब शेख
2) लतिका बालशी
3) रोहिणी शेलार
4) भक्ती वरठा
5) अक्षता चैधरी
माकपा
1) अक्षय दवणेकर एक जागेवर विजय मिळवण्यात यश आलंय.
भाजप-मनसे युतीचा प्रयत्न
यंदाच्या निवडणुकीत पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातमिळवणी करत युती केली होती. भाजप आणि नसे एकत्र आल्याने त्याचा मोठा फटका मविआला बसेल असं बोललं जात होतं. मात्र, युतीचा हा प्रयत्न फसल्याचं दिसत आङे. सापणे येथे शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
पालघर जिल्ह्यातील पंचायत समिती यांच्या 14 जागांचे निकाल
डहाणू
ओसारविरा - राष्ट्रवादी काँग्रेस
सरावली - भाजप
वाडा
सापने - शिवसेना
पालघर
नवापूर - राष्ट्रवादी काँग्रेस
सालवड - भाजप
सरावली (अवधनगर) - शिवसेना
सरावली - भाजप
मान - मनसे
शिगाव - बविआ
बऱ्हाणपूर - शिवसेना
कोंढाण - शिवसेना
नवघर / घाटीम - शिवसेना
वसई
भाताने - बविआ
तिल्हेर - बविआ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.