पालघर साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आणखी 5 आरोपींना अटक

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आणखी 5 आरोपींना अटक

चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाने काठ्या, दांडक्याने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली होती.

  • Share this:

पालघर, 1 मे: चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाने काठ्या, दांडक्याने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पालघर पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी आणखी पाच आरोपींनी अटक केली आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांडप्रकरणी कासा पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना शुक्रवारी डहाणू कोर्टात हजर केले असता त्यांना 13 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाच्या हत्येप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी 110 जणांना अटक केली होती. त्यापैकी नऊ जण अल्पवयीन आहेत. बाल सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा... RED ZONE ची नवी यादी; यानुसारच निर्बंध करणार शिथिल, तुमचा जिल्हा कुठल्या झोनमध्ये?

दरम्यान, या प्रकरणी पोलिस आणखी 400 ते 500 आरोपींचा शोध घेत आहेत. अनेक आरोपी जवळच्या जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी काँबिंग ऑपरेशन सुरु केलं आहे.

ड्रोनच्या मदतीने पकडले, पाहा हा VIDEO

जंगलात लपून बसलेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. यासाठी पोलिस ड्रोनची मदत घेत आहेत. या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणातील काही आरोपही जंगलात लपून बसले आहे. या पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तसंच याप्रकरणी पोलिस इतर आरोपींचा शोध घेत असून काही मंडळींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा.. बँकेची कामं करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या महिन्यात 12 दिवस बँक बंद

दरम्यान, या हत्याकांडात तिघांचा खून केल्याप्रकरणी कासा पोलिसांनी 101 आरोपींना अटक केली होती. या सर्व आरोपींना डहाणू न्यायालयात हजर केले असता त्यांना पहिल्या या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: May 1, 2020, 4:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या