Home /News /maharashtra /

पालघर साधु हत्याकांडाला नवं वळण, सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विचारला जाब

पालघर साधु हत्याकांडाला नवं वळण, सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विचारला जाब

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलं आहे.

    नवी दिल्ली, 11 जून: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केंद्र व महाराष्ट्र सरकारला नोटिस बजावली आहे. पुढील दोन आठवड्यात या प्रकरणाचा खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत लिंचिंग घटनेची सीबीआय चौकशी करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा होकार दिला आहे. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. हेही वाचा.. पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत श्रद्धानंद सरस्वती आणि जूना अखाडाचे काही अन्य साधूंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायपीठात ही सुनावणी झाली. याचिकेत महाराष्ट्र पोलिसांच्या कथित सहभागाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी जाणीवपूर्वक सखोल चौकशी केली नाही, असा दावा याचिकेत केला आहे. आणखी एका याचिकेत एनआयए चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. एनआयए चौकशीच्या दुसऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि इतरांना नोटिसा बजावल्या आहेत. कारण महाराष्ट्र सरकारचा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला विरोध केला होता.  महाराष्ट्र पोलिसांनुसार, या प्रकरणी आतापर्यंत 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 'त्या' रात्री काय झालं होतं? पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिलच्या रात्री कल्पवृक्षगिरी (70), सुशीलगिरी महाराज (35) आणि कार चालक निलेश तेलगडे (30) याची चोर समजून जमावाकडून निर्घृन हत्या करण्यात आली होती. इको कारने तिघे गुजरातमधील सूरतकडे निघाले होते. चालकाची त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशबशी आपली सुटका करून घेतली. मात्र त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर मारेकरी गावाशेजारी असलेल्या जंगलात लपले होते. हेही वाचा.. समुद्राशी नागपुरचा काही संबंध नाही, फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, पवारांचा टोला या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी नाराजीचा सूर आळवत यातून दोषींची सुटका नाही, हे ठामपणे सांगितलं होतं. संकलन, संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Palghar

    पुढील बातम्या